Police are investigating the death of a factory worker following an alleged compressed air assault at an industrial unit in Sanaswadi, Pune district. Saam tv
क्राईम

पुण्यातील संतापजनक घटना! सहकाऱ्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला, पोटात हवा गेल्यानं कामगाराचा मृत्यू

Shocking Crime: पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कामगाराचा मृत्यू झाल्याने. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • औद्योगिक परिसरात धक्कादायक प्रकारात एका कामगाराचा मृत्यू झाला

  • या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

  • या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील सणसवाडीमध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे. एका सहकाऱ्याने आपल्या एका सहकाऱ्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला आणि हवा भरली. कॉम्प्रेसरची हवा पोटात गेल्यानं कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील औद्योगिक परिसरातील एका कंपनीत घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बिकीकुमार भाईलाल सरोज असं संतापजनक कृत्य करणाऱ्या आरोपी कामगाराचे नाव आहे. तर या प्रकरणात संतोषकुमार किशोर यादव (वय ३२) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार ३० जून २०२६ रोजी पहाटे पाचच्या सुमारास सणसवाडी येथील वेस्टर्न इंडिया फोर्ज प्रा. लि. कंपनीमध्ये ही घटना घडली.

आरोपी बिकीकुमार भाईलाल सरोज याने फिर्यादीचा मेहुणा नरेश सुलेंद्र यादव (वय ४२, मूळ जि. गया, बिहार) यांच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला आणि शरीरात हवा सोडली. पोटात मोठ्या प्रमाणात हवा गेल्यानं नरेश यादव प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कामाच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षा, कामगारांवरील देखरेख, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण यावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या विचित्र घटनेमागील नेमके कारण, हेतू आणि इतर सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse : चमोली बोगद्यामध्ये मोठी दुर्घटना! मातीचा ढिगारा अन् पाणी शिरलं, ७ कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: गांजा विक्रीवर एलसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

फुफ्फुसे स्वच्छ करतील हे 5 ड्रिंक्स, रोज सकाळी न चुकत्या प्यायल्यास होईल फायदा

Parbhani health department: गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई; परभणीतील आरोग्य विभागाचे दोन प्रमुख अधिकारी निलंबित

Accident News : भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT