Pimpri Chinchwad elder brother was killed in a dispute Saam Tv News
क्राईम

Pimpri-Chinchwad Crime : ऑफलाईन गेमवरुन लहान भावाचा वाद, मोठा भाऊ जाब विचारायला गेला असता नाहक बळी; पुण्यात खळबळ

Pimpri-Chinchwad Murder News : ऑफलाईन गेम खेळताना झालेल्या हत्याप्रकरणी १९ वर्षीय सोहेब शेखला अटक करण्यात आली आहे. गणेश कुऱ्हाडेचा (वय १६) भाऊ कार्तिक आणि त्याचा मित्र सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर गेम खेळत होते.

Prashant Patil

पुणे : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. पुण्यात तर याचं प्रमाण अधिक होत चाललं आहे. हत्या, बलात्कार, दरोडा यांसारख्या घटनांवर पोलीस चाप लावू शकत नाहीयत. पुणे जिल्ह्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला आहे की नाही? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्याचदरम्यान, शहरात पुन्हा एक हत्येची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ऑफलाईन गेमच्या खेळात एका मुलाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवा व्यापार (ऑफलाईन गेम) खेळताना दोन मित्रांमध्ये भांडण झालं. त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या मोठ्या तथा अल्पवयीन भावाचा यात नाहक बळी गेला.

ऑफलाईन गेम खेळताना झालेल्या हत्याप्रकरणी १९ वर्षीय सोहेब शेखला अटक करण्यात आली आहे. गणेश कुऱ्हाडेचा (वय १६) भाऊ कार्तिक आणि त्याचा मित्र सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर गेम खेळत होते. कॅरम खेळून झाल्यावर त्यांनी नवा व्यापार हा गेम खेळायला सुरुवात केली. मात्र, खेळता-खेळता वादाला तोंड फुटलं, मग सोहेबने कार्तिकला मारहाण केली. कार्तिकने घरी येताच आपला मोठा भाऊ गणेशला याबाबत सांगितलं. गणेशने सोहेबकडे जात त्याला जाब विचारला.

लहान असताना जाब कसा काय विचारला? या रागातून सोहेबने गणेशच्या पायात-पाय टाकून त्याला सिमेंटच्या रस्त्यावर जमिनीवर आडवं पाडलं अन् लाथांनी मारहाणही केली. या घटनेत गणेशच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला, तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केलं. किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एका निष्पाप आणि कुठलाही संबंध नसलेल्या गणेशला आपला जीव गमावावा लागला. निष्पाप गणेशचा आणि आरोपी सोहेबचा काहीच वाद नव्हता. मात्र, भावाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारला गेला अन् त्याचा नाहक बळी गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT