Pune Police Saam Tv
क्राईम

Pune Exclusive: ड्रग्ज प्रकरणी नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी; गुन्हे शाखेची पहाटेपासून कारवाई, १० पथके तैनात

Raid On Nigerian Gangs: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अमली पदार्थांचा वावर वाढला आहे. याप्रकरणी आता पुणे पोलीस अलर्टमोडवर आले आहेत.

Rohini Gudaghe

Akshay Badwe

Pune Crime News

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अमली पदार्थांचा वावर (Raid On Nigerian Gangs) वाढला आहे. याप्रकरणी आता पुणे पोलीस अलर्टमोडवर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पहाटेपासून कारवाई सुरू केली आहे. पोलीसांनी नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू केली आहे. आज पहाटेपासूनच ही कारवाई केली जात आहे. (Latest Crime News)

पुणे पोलीस नायजेरीयन ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीवर कारवाई करत आहेत. ड्रग्स पुरवणाऱ्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानी पोलीस छापेमारी करत (Pune Exclusive) आहेत. त्यामुळे शहरात एकच दाणादाण उडाली आहे. नायजेरीयन गँगच्या घरांवर पोलीस पहाटेपासूनच धाड टाकत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी

पुणे पोलिसांनी पहाटेपासून शहरातील विविध भागात कारवाई सुरू केली आहे. कोंढवा, हडपसर, कात्रज, वानवडी या परिसरात असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानावर पोलीस कारवाई करत (Police Crime Branch) आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे १० पथके ही कारवाई करत आहेत. नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पुणे शहरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. यामुळे संपूर्ण राज्याला हादरवून टाकले होते. याशिवाय या ड्रग्ज प्रकरणाचे नॅशनल इंटरनॅशल कनेक्शन असल्याचं देखील समोर (Nigerian Gangs Narcotics Case) आलं होतं. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी संपूर्ण देशभरात छापे टाकले होते. कोट्यवधी रूपयांचं ड्रग्ज देखील जप्त केलं होतं.

पुणे ड्रग्ज प्रकरण

पुणे शहरात अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना असल्याचं देखील फेब्रुवारी महिन्यात समोर आलं होतं. पोलिसांनी अनिल साबळे आणि युवराज भुजबळ या दोघांना अटक केली होती. त्यांनी कुरकुंभ येथे एमडी बनविण्याचा कारखाना सुरू केला (Narcotics Case) होता. पुणे पोलिसांनी यावर कारवाई करत कंपनी सील केली होती.

पुणे ड्रग्ज प्रकरण्याचं देशभर नेटवर्क पसरलेलं आहे. पुण्यात आणि इतर ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स मिळून आले होते. अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आरोपींनी टोपण नावे तयार केली (Pune Crime) होती. आरोपींना ३ महिन्यात २००० किलो एमडी बनवण्याचं टार्गेट दिल्याचं समोर आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT