Cyber Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime: निवृत्त महिला अधिकाऱ्याची कोट्यवधींची फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा गंडा

Cyber Crime News: पुण्यातील एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची पावणे तीन कोटींची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून महिलेला गंडा घातला आहे.

Rohini Gudaghe

Akshay Badwe

Retired Woman Officer Cheated

खरं तर दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातील एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची पावणे तीन कोटींची फसवणूक झाल्याची घटना घडली (Retired Woman Officer Cheated) आहे. आरोपीने गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून या महिलेला गंडा घातला आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

पुण्यातील एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची पावणे तीन कोटींची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने (वय ७०) सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली (Pune Crime) आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच यासंबंधी त्यांनी तपास देखील सुरू केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिला अधिकाऱ्याची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील हनुमाननगर परिसरात राहते. या महिला अधिकाऱ्याने सेवानिवृत्तीनंतर मिळालेली आणि गुंतवणुकीतील रक्कम बँकेत ठेवली (Cyber Crime) होती.

एके दिवशी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असा मेसेज केला. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक (Cyber Crime News) दिला. चोरट्यांनी सुरुवातीला महिलेने गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा दिला. त्यामुळे या महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला.

सायबर चोरट्यांनी घातला कोट्यवधींना गंडा

आरोपींवर विश्वास बसल्यामुळे महिलेने आणखी गुंतवणूक करण्याचं ठरवलं होतं. पीडित महिलेनं पुढील काही महिन्यांत वेगवेगळ्या बँक खात्यात दोन कोटी ८४ लाख ५९ हजार रुपयांची गुंतवणूक (Crime news) केली. परंतु महिलेला त्याचा परतावा मिळाला नाही. यानंतर फसवणूक झाल्याचं पीडित महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली अन् अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

गुंतवणूकीवर चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, अन्यथा मोठं नुकसान होऊ (share market) शकतं. पुण्यात या महिलेला सायबर चोरट्यांनी कोट्यवधींना गंडा घातला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

SCROLL FOR NEXT