Exam Cheating Video : परीक्षेत कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याचा देसी जुगाड; 20 रुपयांच्या नोटेवर अशी लपवली उत्तरे...पाहा व्हिडिओ

Cheating In Exam Video Viral : विद्यार्थ्यांमधील कला आणि गुणांना वाव दिला जातो. बरेच विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करतात, बुद्धीला चालना देतात आणि पुढे जातात. मात्र अनेक विद्यार्थी परीक्षेत कॉपी करतात.
Exam Cheating Video
Exam Cheating VideoSaam TV
Published On

Cheating With 20rs Currency In Exam :

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात परीक्षा फार महत्वपूर्ण असते. आपण वर्षभर जो काही अभ्यास केला आहे त्याचे मोजमाप परीक्षेतून केले जाते. विद्यार्थ्यांमधील कला आणि गुणांना वाव दिला जातो. बरेच विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करतात, बुद्धीला चालना देतात आणि पुढे जातात. मात्र अनेक विद्यार्थी परीक्षेत कॉपी करतात.

Exam Cheating Video
Mukesh and Nita Ambani: 'प्यार हुआ, इकरार हुआ', रोमँटिक गाण्यावर मुकेश अंबानी-नीता अंबानींचा डान्स; पाहा Viral Video

सध्या महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. 10 वी आणि 12 चे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. अशात सोशल मीडियावर अनेक अघाव विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओमध्ये मुलं कशाप्रकारे कॉपी करतात हे दिसत आहे. सध्या देखील असाच एक व्हिडिओ चर्चेत आलाय.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केलेला नाही. त्यामुळे आता ऐन परीक्षेच्या वेळी त्याला काय करावे आणि काय नाही हे सुचत नाहीये. आपण नापास झालो तर सगळे आपल्याला हसतील आणि आपण मागे पडू या चिंतेत विद्यार्थ्याने चुकीचा मार्ग निवडला आहे.

काही विद्यार्थी आपल्या शर्ट आणि पँटच्या खिशात पैसे लपवून ठेवतात. मात्र ही कॉपी शिक्षक लगेचच पकडतात. त्यामुळे या विद्यार्थ्याने आपल्या थेट 20 रुपयांच्या नोटेवर उत्तरे लिहिलेली. या नोटेवर त्याने आणखी एक नोट चीतकवलिये आणि आपली उत्तरे या दोन नोटांमध्ये ठेवली आहेत. या तरुणाने केलेला जुगाड पाहून सारेच थक्क झालेत.

अनेकांनी यावर हास्यास्पद कमेंट केल्यात. तर काहींनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे. असे करून विद्यार्थी शिक्षकांची नाही तर स्वतःची फसवणूक करतात असं एकाने म्हटलं आहे. अशी बुद्धी कुणाच्याच कामाची नाही, नोट चीटकवली खरी पण पुन्हा कधी उघडणार, अशही काही कमेंट आल्या आहेत. @maximum_manthan या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

Exam Cheating Video
Loksabha Election निश्चितीसाठी भाजपची समिती? #shorts | Marathi News

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com