IT Engineer Arrested in Hadapsar for Brutally Beating Wife Over Mango Box Payment Saam tv
क्राईम

Pune Crime News : पुणे तिथं काय उणे! आंब्याचे पैसे कोण देणार? या क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये जोरदार हाणामारी

Pune Crime News : पुण्याच्या हडपसर येथे क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीला मारहाण केली आहे. आंब्याच्या पेटीच्या पैशावरून पती- पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं आहे.

Manasvi Choudhary

Pune Hadapsar Crime News: पुण्याच्या हडपसर परिसरात एका क्षुल्लक कारणावरून पती- पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. आंब्याची पेटी मागवल्यानंतर पैसे कोण देणार? यामुळे पती- पत्नीमध्ये वाद झाला आहे. या वादातून पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली आहे. या घटनेनंतर संतप्त पत्नीने पतीच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हडपसरमधील साडेसतरा परिसरात ही घटना घडली आहे. हडपसर येथील एका सोसायटीमध्ये पती- पत्नी दोघेजण राहतात. पती कामाला गेल्यानंतर पत्नीने सोसायटीच्या बाहेरील एका फळविक्रेत्याकडून आंब्याची पेटी मागिवली होती. विक्रेत्याने आंब्याची पेटी आणल्यानंतर त्याचे पैसे देण्यासाठी तिने पतीला सांगितले. मात्र पतीला याचा राग आला त्याने पत्नीला मारहाण केली आहे. या घटनेची तक्रार महिलेने पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी हा एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. तक्रारदार महिलेने २३ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोसायटीसमोरील स्टॉलवरून ८५० रुपयांची आंब्याची पेटी मागवली होती. विक्रेता घरी आल्यानंतर पत्नीने तिच्या पतीच्या मोबाइलवर ऑनलाइन पैसे भरण्यासाठी स्कॅनर पाठवला असता याचा राग पतीला आला. यानंतर पती- पत्नी दोघांमध्ये वाद सुरू झाला.

वाद वाढत असल्याचे पाहून पत्नीने आपल्या मोबाईलवर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ काढला. यामुळे आरोपी पती प्रचंड संतापला. त्याने पत्नीच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला आणि तोंडावर फेकून मारला. मोबाइल महिलेच्या भुवईवर लागल्याने महिला जखमी झाली आहे. एवढंच नाही तर आरोपीने महिलेला लाथा मारून शिवीगाळ देखील केली आहे. या प्रकरणाची तक्रार महिलेने पोलिसांना दिल्यानंतर हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

LPG Gas Cylinder : ग्राहकांसाठी मोठी बातमी! वर्षाला ६ सिलिंडर मिळणार मोफत; कुठे आणि कोणासाठी लागू केला आहे हा निर्णय? वाचा

वर्षांपूर्वी रस्ता बांधताना आक्षेप घेतला नाही म्हणून भरपाई नाकारता येईल का? उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं...

Asian Games 2026: भारताला दुसरं गोल्ड! कमलजीत-सुरुचीची जोडी ठरली भारी, एशियन गेम्समध्ये रचला विक्रम

Maharashtra News Live Update : नंदुरबार: प्रथम माणाचा गणपती असलेल्या दादा आणि बाबा गणपतीचा रथ दोरीने ओढत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात..

SCROLL FOR NEXT