Pune crime: Ghavyal gang creates panic after broad daylight firing in Kothrud. x
क्राईम

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Ghavyal Gang Shoots Man in Broad Daylight: पुणे तिथे गुन्हेच गुन्हे. हो, पुण्यातील गँगवॉर आता सर्वसामान्याच्या जीवावर उठलयं. सामान्य पुणेकरांवर पुण्यातले गँगस्टर भररस्त्यात गोळ्या घालतायत. कोथरूडसारख्या परिसरात हा थरार घडलाय. कोणती आहे गुंडांची टोळी आणि कोण आहे त्यांचा म्होरक्या? पुणे पोलिसांचा कसा झालाय खुळखुळा. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.

Snehil Shivaji

  • पुणे आता क्राईम कॅपिटल झालंय.

  • पुण्यात सुरू असलेलं गँगवॉर आता थेट सामान्य पुणेकरांच्या जीवावर उठलंय.

  • रात्री 12 दरम्यान, कोथरुड गोळीबारानं हादरलं

राज्याची सांस्कृतीक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आता क्राईम कॅपिटल झालंय. पुणे तेथे गुन्हेच गुन्हे असंच चित्र आता समोर आलंय. पुण्यात सुरू असलेलं गँगवॉर आता थेट सामान्य पुणेकरांच्या जीवावर उठलंय.गँगस्टर दिवसाढवळ्या सामान्यांवर गोळ्या झाडतायत. आणि कोयत्यानं सपासप वार करतायंत.

होय असाच थरार पुण्याच्या कोथरूडमध्ये घडलाय. हे ऐकून तुम्ही पुण्यात वाहनं चालवणं सोडून द्याल. पाहा..(MORNING PUNE FIRING मधील रक्ताचे विज लावा) तुम्ही पाहत असलेलं रक्त पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची ग्वाही देतायेत. ही दृष्यचं तुम्हाला सांगतील की बुधवारी मध्यरात्री इथं काय घडलं असेल.

गँगस्टर उठले पुणेकरांच्या जीवावर

रात्री 12 दरम्यान, कोथरुड गोळीबारानं हादरलं

गाडीला साईड न दिल्यानं वाहन चालकावर गोळीबार

प्रशांत धुमाळ यांच्यावर चौघांनी 3 गोळ्या झाडल्या

आम्हीच इथले भाई म्हणत गुंडांचा हैदोस

गोळीबारानंतर वैभव साठे या युवकावर कोयत्यानं हल्ला

सर्व सामान्य पुणेकरांवर कोयते चालवणारे आणि बंदुका रोखणारे हे गुंड कुख्यात गँगस्टर निलेश घायवळच्या टोळीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी नेहमी प्रमाणे तपास सुरुये कारवाई करु अशी उत्तर दिलीयेत. परंतू आमदार रोहित पवारांनी थेट विधान परिषेदेचे सभापती राम शिंदेंवर आरोप करत त्यांचे गुन्हेगारांना अभय असल्याचं म्हटलंय.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे विधानभवनात घेऊन फिरतात त्याच्या टोळीने गाडीला साईड न दिल्याच्या रागातून पुण्यात (कोथरुड) भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहनचालकाला जखमी केलं. आता मुख्यमंत्री या गुंडाच्या टोळीवर काय कारवाई करतात की हा गुंड विधानपरिषदेच्या सभापती महोदयांचा खास माणूस आहे म्हणून त्याला हमखास पाठीशी घालतात, हेच पहायचंय..!

पुण्यातल्या या धक्कादायक घटनेनंतर पोलिस सुट्टीवर गेलेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण पोलिस स्टेशन पासून अवघ्या 200 मीटरवर गुंडांचा हैदोस होऊनही पोलिसांना घटनास्थळी पोहचायला चक्क अर्धातास लागला. पुण्याला गँगवॉर काही नवा नाही. भर गणेशोत्सवात पोलिसांच्या नाकावर टिच्चून आंदेकर टोळीनं मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी निष्पाप नातवावर गोळ्या झाडून त्याच्या शरीराची अक्षरश चाळण केली होती. गुंडांना पोलिसांचा धाक नसल्यामुळे आता त्यांची वक्रदृष्टी पुणेकरांवर पडलीये. त्यामुळे पुणे पोलिसांचा खुळखुळा झाला असून या गुंडांच्या मुसक्या आवळण्याचं मोठं आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT