Pune Cyber Crime Saam tv
क्राईम

Pune Cyber Crime: CBI चौकशीची भिती दाखवून डॉक्टरला घातला ३० लाखांचा गंडा; पुण्यातील धक्कादायक घटना!

Pune Cyber Crime: सीबीआय कडून मनी लॉन्ड्रिंगची चौकशी करण्यात येणार असल्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी डॉक्टरची फसवणूक केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. १६ एप्रिल २०२४

सीबीआयकडून मनी लॉन्ड्रिंगची चौकशी करण्यात येणार असल्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी डॉक्टरची फसवणूक केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. या प्रकरणी एका ६७ वर्षीय डॉक्टरने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे शहरात एकीकडे गुन्हेगारी घटनांनी कळस गाठलेला असताना ऑनलाईन फसवणूकीचे प्रकारही समोर येत आहेत. पुण्यातील कर्वेनगर भागातील एका डॉक्टरची सायबर चोरट्यांकडून तब्बल ३० लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ६७ वर्षीय डॉक्टरने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी पीडित डॉक्टरांच्या फोनवर फोन करत त्यांच्या मुंबईहून प्रदीप शर्मा बोलत असल्याचे सांगितले. मनी लॉन्ड्रिंगच्या व्यवहारात सीबीआयकडून तुमची चौकशी करण्यात येत असल्याची त्यांना धमकी दिली. चोरट्यांनी डॉक्टरकडे आधारकार्ड, बँक खातेची माहिती मागितली.

तसेच, बँक खात्याचा तपास करण्यासाठी ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना धमकावून वेळोवेळी ३० लाख ५७ हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वारजे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT