Pimpri chinchwad Crime 
क्राईम

Pune Crime: मोबाईलचा नाद लय बेकार; पतीने हट्ट न पुरवल्यानं महिलेनं संपवलं जीवन

Bharat Jadhav

गोपाल मोटाघरे, साम प्रतिनिधी

सध्या मोबाईल आपल्या बहुतेकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाईलशिवाय लोकांची कामे होतच नाहीत. अडचणीच्या काळात मोबाईल कामी पडत असतो. परंतु मोबाईलचा नादामुळे एखाद्याचा देखील जीव जाऊ शकतो. अशी घटना पिंपरी चिंचवड येथे घडलीय. मोबाईलच्या नादामुळे एका महिलेने आपलं जीवन संपवलंय. पतीने मोबाईलचा हट्ट पुरवला नाही म्हणून महिलेने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात घडलीय.

शिवानी गोपाल शर्मा असं आत्महत्या केलेल्या वीस वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. शिवानी या गेल्या काही दिवसांपासून आपला पती गोपाल शर्मा ह्यांच्याकडे मोबाईलचा हट्ट करत होती. गोपाल करत असलेली नोकरी अन् तिथून मिळणाऱ्या पगारातून तो तातडीनं मोबाईल खरेदी करू शकत नव्हता. म्हणूनच पगार झाल्यावर मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू, असं गोपाल शर्माने आपली पत्नी शिवानी हिला सांगितलं होतं.

मात्र शिवानी घरी एकटीच असायची अन टाईमपास साठी त्यांना मोबाईल हवाचं होता. अखेर तो हट्ट पूर्ण न झाल्याने बुधवारी त्यांनी घरात पती नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. पती जेव्हा नोकरीवरून घरी परत आला. तेव्हा पत्नीने आत्महत्या केल्याचं समोर आले. वाकड पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर मोबाईलच्या हट्टा पायी पत्नीने गळफास घेतल्याचं उजेडत आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हिंगोलीत नवविवाहित महिलेने संपवलं जीवन

दोन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या एका तरुणीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. हिंगोली शहरातील व्हीआयपी लॉज असलेल्या गणेश इन हॉटेलमध्ये हा प्रकार उघडा झाला आहे. मूळची संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील असलेली ही तरुणी आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी आली होती, मात्र दुपारी अचानक तिने बहिणीचे घर सोडत गणेश इन लॉजमध्ये रूम बूक केली आणि त्या रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

नंदिनी वीरेंद्र तिवारी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने आपल्या बहिणीसह तिच्या पतीला मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे मेसेज करत आपण स्वतःला सिद्ध करू शकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं तिने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपचार घेण्यास नकार

MVA Meeting : जागावाटपाबाबत मविआची बैठक सुरू

Maharashtra News Live Updates: माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना हवं बिहार मॉडेल? जागावाटपाचाही दिला नवा प्रस्ताव, काय आहे सत्तेचं हे मॉडेल? वाचा...

Breaking News : नंदुरबारमध्ये दोन गटांत तणाव, तुफान दगडफेक; पहा Video

SCROLL FOR NEXT