Pune Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime: भारतीय लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक, लुबाडले लाखो रुपये

Pune Crime: लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक करणाऱ्या नितीन बालाजी सूर्यवंशी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

भारतीय लष्कारात जाण्याचं तुमचं स्वप्न असेल आणि तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लष्कारात नोकरी करण्याचं स्वप्न असेल आणि कोणी तिला भेटून नोकरी मिळवून देण्याचं आमिष देत असेल तर सावधान. लष्करात नोकरी मिळून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक करण्याची घटना पुण्यात घडलीय. भारतीय लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडलीय.

याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. लष्कर गुप्तचर आणि बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणात करावाई करत बोगस कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन बालाजी सूर्यवंशी असे या बोगस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सूर्यवंशी मूळचा लातूरचा आहे, तो काही महिने लष्कर दलाच्या कॅन्टींनमध्ये कंत्राट पद्धतीने काम करत होता.

त्यावेळी झालेल्या ओळखीच्या जोरावर त्याने अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणात नांदेड जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. नितीन सूर्यवंशीने आणखी काही तरुणांना ३ लाख रुपये दिले तर भारतीय लष्कर दलात भरती करतो, असे सांगून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अशी झाली फसवणूक

फिर्यादी लष्कर दलाच्या भरतीसाठी पुण्यात वास्तव्यास आहे. फिर्यादी आणि सूर्यवंशी यांची ओळख उदगीर रेल्वे स्थानकावर झाली. यावेळी सूर्यवंशीने फिर्यादी यांना सदर्न कमांड कॅन्टींन आणि सब एरिया कॅन्टींन येथे भेटायला बोलावले. सूर्यवंशी तेव्हा विश्वास संपादन करण्यासाठी लष्कर दलाच्या गणवेशात भेटायला आला.

एक महिन्यात दलात नोकरी लावून देतो. त्यासाठी दोन लाख रुपये लागतील, असे त्याने सांगितले. त्याच्या अंगावरील गणवेश पाहून फिर्यादीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यांनी रोख व ऑनलाइन मिळून अशी १ लाख ७५ हजार रुपये पाठविले. यानंतर अनेक वेळा फिर्यादी यांनी सूर्यवंशीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT