pune st depot crime  saam tv
क्राईम

Pune Crime : एसटी बस की सेक्स रॅकेटचा अड्डा? बसमध्ये आढळले कंडोम्स, चादरी, गांजा; VIDEO

Pune News : पुण्यातल्या अत्याचारानंतर एसटी बस स्थानकातील सेक्स रॅकेटचं धक्कादायक वास्तव उघड झालंय.. मात्र बस स्थानकात शिवशाही बसमध्ये कसं चालतं सेक्स रॅकेट आणि हा संतापजनक प्रकार कसा उघड झाला? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Crime News : पुण्यात स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराची संतापजनक घटना घडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडालीय... मात्र या घटनेच्या निमित्ताने स्वारगेट डेपोतील अडगळीत पडलेल्या बसेसमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. साम टीव्हीनं थेट या बसमध्ये जाऊन या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

सुस्त एसटी प्रशासनामुळेच स्वारगेट बस स्थानकातल्या या अडगळीतल्या बसेस गुन्हागारांचा अड्डाच बनल्या आहेत. आणि त्यामुळेच एक तरुणी बलात्काराला बळी पडलीय. या बसमध्ये नेमकं काय सापडलं ते पाहूयात..

एसटी बसमध्ये रात्रीस खेळ चाले !

- 30 कंडोम

- 5 साड्या

- 6 ब्लँकेट

- 1 चादर

- कपडे

- ओढण्या

- गांजा

- सिगारेट

- दारूच्या बाटल्या

शिवशाही बसमध्ये पडलेल्या वस्तू पाहिल्यानंतर या बसेसमध्ये सेक्स रॅकेट चालत हे जरी स्पष्ट असलं तरी या तरुणीसारख्याच यापूर्वी आणखी किती मुलींवर अत्याचार तर झाले नाहीत ना याची चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळेच ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी मात्र सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.

एकीकडे महिलांना प्रवासी तिकीटात 50 टक्के सुट दिली जातेय.. मात्र दुसरीकडे याच महामंडळाच्या जुन्या बस महिलांच्या सुरक्षेवर उठल्या आहेत.. त्यामुळे एसटी बस डेपोतील वाऱ्यावर असलेली सुरक्षा आणि सेक्स रॅकेटचा अड्डा बनलेल्या जुन्या बसेसची कधी विल्हेवाट लागणार? हा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT