Sharad Mohol Murder Revenge  Saam Tv
क्राईम

Pune Crime News: शरद मोहोळच्या हत्येचा बदला घ्यायला आले आणि जेलमध्ये गेले; पुणे पोलिसांनी उधळला गँगवॉरचा कट

Sharad Mohol Murder Revenge: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ जणांना पिस्तुलासह अटक केली आहे. हे दोन जण शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचा कट रचत होते.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

शरद मोहोळ यांचा मागील वर्षी ५ जानेवारी रोजी त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्याचा कट रचणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना अटक करत पुणे पोलिसांनी शहरात होऊ शकणारे गँगवॉर थांबवलंय. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडून दोन पिस्तूल जप्त केलं आहे.

पुण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिटने दोन जणांना अटक केली. शरद मालपोटे आणि संदेश कडू अशी अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. या दोघांच्या ताब्यातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आली आहेत. गुंड शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे दोघे प्लानिग करत होते. दरम्यान याच्या प्लानिगमध्ये अजून एकाचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांना आहे. आता पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या शरद मोहोळ यांच्या हत्येला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्याआधीच या हत्येचा बदला घेण्याची तयारी या दोघांनी केली होती. त्यासाठी या दोघांनी पिस्तूल सुद्धा आणले होते. नेमकं त्यांचे "टार्गेट" कोण होते हे समजू शकलेले नाही. या संपूर्ण कटात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळालीय. सध्या शरद मोहोळ हत्ये संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी गुंड विठ्ठल शेलारसह १७ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आलीय.

शरद मोहोळाचा हत्याकांड

पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ याची त्याच्याच टोळीतील सदस्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. कथित आर्थिक वादातून मोहोळची हत्या झाल्याचं सांगितलं जातं. याच हत्येचा बदला घेण्याचा कट शिजत होता. ५ जानेवारी २०२४ दुपारी दीडच्या सुमारास मोहोळ याच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी सुतारदरा येथील घराजवळ त्याच्यावर गोळीबार केला होता. शरद मोहळसोबत सतत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडल्या होत्या.

शरद मोहोळ याच्यावर ३ जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. यात एक गोळी त्याच्या छातीला लागली होती. तर दोन गोळ्या खांद्याला लागल्या होत्या. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रक्तस्राव जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी ८ संशयितांना ताब्यात घेतलं होतं आणि तीन पिस्तूल आणि मॅगझिन पोलिसांनी जप्त केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT