Kamothe Crime : कामोठ्यातील दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैगिंक संबंधाचा हट्ट धरला

Kamothe Crime update : कामोठ्यातील दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. समलैगिंक संबंधाचा हट्ट धरल्याने हत्याकांड घडल्याची माहिती हाती आली आहे. हत्याकांडाचा उलगडा झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
कामोठ्यातील दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैगिंक संबंधाचा हट्ट धरला
Kamothe CrimeSaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

नवी मुंबई : नवी मुंबईच्या कामोठे येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा अखेर झाला आहे. कामोठ्यातील दुहेरी हत्याकांड हे समलैंगिक संबंधास आग्रह केल्याने हत्या झाल्याचं उघड झालं आहे. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड घडलं होतं. या हत्याकांडाने संपूर्ण कामोठे शहर हादरलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड घडलं होतं. कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीम सोसायटीच्या प्लॅट क्रमांक १०४ मध्ये ७० वर्षीय गीता जग्गा आणि त्यांचा ४५ वर्षीय मुलगा भूषण जग्गी यांचा मृतदेह आढळला होता. यावेळी जितेंद्रच्या अंगावर मारल्याचे व्रण आढळले होते. त्यानंतर कामोठे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास सुरु केला होता.

कामोठ्यातील दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैगिंक संबंधाचा हट्ट धरला
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत घरात आढळला मायलेकाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ,VIDEO

या प्रकरणात पोलिसांनी संशयित संज्योत दोडके आणि शुभम नारायणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मृत जितेंद्र जग्गी आणि दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत होते. ३१ डिसेंबरच्या रात्री जितेंद्र याने दोघांना त्याच्या घरी पार्टी करण्यासाठी बोलावलं होतं. या पार्टीमध्ये दारू प्यायल्यानंतर जितेंद्र याने दोन्ही आरोपींकडे समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आग्रह केला. यामुळे शुभम नारायणी याने एक्टेंशन बोर्ड जितेंद्रच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली. तर संज्योत दोडके याने गीता जग्गी यांची गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

कामोठ्यातील दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैगिंक संबंधाचा हट्ट धरला
Nagpur Crime: धावत्या ट्रेनमध्ये हत्येचा थरार, मोबाईल चोरीच्या संशयावरून तरूणाची हत्या

घरात आढळला होता मायलेकाचा मृतदेह

नवी मुंबईतील कामोठ्यात एका घरात मायलेकाचा मृतदेह आढळला होता. दोघांचीही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. कामोठे येथील इमारतीतील एका घरात मृतदेह आढळला होता. घरातील व्यक्तींनी प्रतिसाद न दिल्याने रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली होती. यानंतर कामोठे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी दरवाजा बाहेरून उघडून पाहणी केली होती. त्यानंतर कामोठ्यात मायलेकाचा दोघांचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घरात एलपीजी गॅस लिक असल्याचेही आढळले होते.

कामोठ्यातील दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैगिंक संबंधाचा हट्ट धरला
Sakri crime News : कंपनीच्या आवारात कॉपर केबल चोरी; चारजण पोलिसांच्या ताब्यात, १३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com