Pune Crime News saam tv
क्राईम

Pune Crime News: वारीत चोरी करणाऱ्या महिला आरोपीचे पोलिसांच्या तावडीतून पलायन; महिला पोलीस कर्मचारी निलंबित

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ५ जुलै २०२४

पुणे पोलिसांच्या तावडीतून चोरीच्या प्रकरणातील महिला आरोपीने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला असून याप्रकरणी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात महिलांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी धुरपता अशोक भोसले हिला मंगळवारी हडपसर पोलिसांनी अटक केली होती. याच महिला आरोपीने पोलिसांची नजर चुकवून बुधवारी पोलिसांची नजर चुकवून पलायन केले.

याप्रकरणी कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा केल्याने महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस सध्या फरार महिला आरोपीचा शोध घेत आहेत.

शिक्षण उपसंचालकसाह पत्नीवर गुन्हा दाखल

बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी पुण्यातील तत्कालीन शिक्षण उपसंचालकसाह पत्नीवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण वसंत अहिरे पत्नी स्मिता प्रवीण अहिरे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या व पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार २०० (ज्ञात उत्पन्नापेक्षा २५.२६ टक्के) किंमतीची संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमवल्या प्रकरणी पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : संतापजनक! निर्दयी बापाने 2 चिमुकल्या मुलींना नदीत फेकलं; मन सुन्न करणारी घटना, आरोपीला अटक

Lakshmi Narayan Rajyog: ४ दिवसांनी तूळ राशी बनणार लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या संपत्तीत होणार वाढ

Weather Alert : पुण्यासह ९ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट, तुफान पाऊस कोसळणार; वाचा वेदर रिपोर्ट

Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT