Pune Crime News Saam Digital
क्राईम

Pune Crime News: भाई जेलमध्ये, पंटरांनी येरवडा जेलच्या प्रतिकृतीचा कापला केक ..., नंतर पोलिसांनी काढली धिंड

Pune Crime News: पुण्याच्या जनवाडी परिसरात भररस्त्यात केक कापून तुरुंगात असलेल्या आरोपीचा वाढदिवस साजरा करणं तरुणांना चांगलंच भोवलं आहे. केक कापणाऱ्या या सर्व तरुणांना अटक करून जिथे केक कापला तिथून त्यांची पोलिसांनी दिंड काढली.

Sandeep Gawade

Pune Crime News

पुण्याच्या जनवाडी परिसरात भररस्त्यात केक कापून तुरुंगात असलेल्या आरोपीचा वाढदिवस साजरा करणं तरुणांना चांगलंच भोवलं आहे. केक कापणाऱ्या या सर्व तरुणांना अटक करून जिथे केक कापला तिथून त्यांची पोलिसांनी दिंड काढली. धक्कादायक म्हणजे हा आरोपी ज्या तुरुंगात आहे त्या तुरुंगाची प्रतिकृती असलेला केक या तरुणांनी आणला होता. दरम्यान पोलिसांनी या तरुणांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनवाडी परिसरात रात्री बारा वाजता काही तरुण वाढदिवस साजरा करत होते आणि वाढदिवस ज्याचा होता तो मात्र तुरुंगात होता. मोक्काच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र या तरुणांनी "भाईंचा" वाढदिवस साजरा केला. वाढदिवसासाठी आणलेला केकही खास होता. येरवडा जेलची प्रतिकृती आलेला केक या मुलांनी आणला होता. त्यावर होता भाईचा फोटो आणि येरवडा कारागृहाचा फोटो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्ता अडवून, दुचाक्या उभ्या करून, तुरुंगात असलेल्या भाईचा वाढदिवस साजरा झाला आणि केक या पोरांनी तलवारीने कापला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांपर्यंत पोहोचला आणि आता पोलिसांनी या सगळ्या तरुणांना अटक केली असून जिथे केक कापला तिथूनच त्यांची धिंड काढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT