Honey Trap Case News SAAM TV
क्राईम

Pune Honey Trap: खळबळजनक! हनी ट्रॅपच्या टोळीत 'पीएसआय'चा सहभाग, पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला लुटलं, ३ जणांना अटक

Pune latest News: कोथरूड भागातील एका ज्येष्ठाला मोहजालात अडकवून महिलेने एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर पोलीस आणि महिला हक्क आयोगाचे सदस्य असल्याचे सांगून ज्येष्ठाला मारहाण करण्यात आली.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ५ ऑगस्ट २०२४

पुण्यात हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीत चक्क पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काशिनाथ मारुती उभे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो पसार झाला आहे. तर याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला मोहजालात अडकवून लुटल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीत चक्क पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. काशिनाथ मारुती उभे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल होताच फरार झाला असून सध्या पोलीस शोध घेत आहेत.

कोथरूड भागातील एका ज्येष्ठाला मोहजालात अडकवून महिलेने एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर पोलीस आणि महिला हक्क आयोगाचे सदस्य असल्याचे सांगून ज्येष्ठाला मारहाण करण्यात आली. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याच्याकडील २० हजारांची रोकड मोबाईल काढून घेण्यात आला.

२९ जुलै रोजी लक्ष्मी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी तीन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता उभे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी अवंतिका सोनवणे, पूनम पाटील, आरती गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT