Pimpri-Chinchwad Crime News  saam tv
क्राईम

Crime News: प्रेयसीला दुसऱ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; रागाचा पारा चढला, दोघांना दगडाने ठेचलं, दुहेरी हत्याकांडानं पिंपरी चिंचवड हादरलं

Pimpri-Chinchwad Crime News: आपल्या प्रेयसीला दुसऱ्यासोबत पाहिल्यानंतर प्रियकराचं टाळकं सरकलं. त्याने दोघांचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

Bharat Jadhav

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांडाची घटना पिंपरी चिंचवडमधील तळवडे परिसरात घडली. याप्रकरणी देहू रोड पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेयसी दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवत असल्याचा राग मनात धरत एका व्यक्तीने प्रेयसी आणि तिच्या पार्टनरचा खून केला. याप्रकरणी पोलिसानी तपासाची चक्रं फिरवत अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय लक्ष्मण साबळे (वय ४९) असं आरोपीचे नाव आहे. दत्तात्रय लक्ष्मण साबळे, जगन्नाथ पुंडलिक सरोदे आणि मंगला सुरज टेंबरे हे बांधकाम कामगार होते. दत्तात्रय हा मंगला टेंबरेचा प्रियकर होता. पण मंगला हिचे जगन्नाथ पुंडलिक सरोदेसोबतही शारीरिक संबंध होते. या दोघांना शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दत्तात्रय साबळेनं पाहिलं होतं. आपली प्रेयसी दुसऱ्यासोबत संबंध ठेवत असल्याचा राग दत्तात्रयला आला होता. त्याने दोघांना शिक्षा करण्याचं ठरवलं. दत्तात्रयने तळवडे परिसरातील डाउनटाउन हॉटेलच्या मागे जगन्नाथ सरोदे आणि मंगला टेंबरे यांचा दगडाने ठेचून खून केला.

मंगलाचं जगन्नाथसोबतही प्रेम संबंध होते. याची माहिती दत्तात्रय साबळेला मिळाली होती. दोघांना शारीरिक संबंध प्रस्थापित करताना पाहिल्यानंतर दत्तात्रय साबळेला राग अनावर झाला. त्यानंतर त्याने रागाच्या भरात मंगला आणि जगन्नाथ यांचा खून केला. सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून दोघांची निर्घृण हत्या केली. मध्यरात्री घटना घडली होती. हत्या केल्यानंतर आरोपी दत्तात्रय फरार झाला होता, याबाबतची माहिती देहू रोड पोलिसांनी दिली.

या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दोन्ही मृतक आणि आरोपी हे बांधकाम कामगार होते अशी माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांच्या प्राथमिक तपासात दत्तात्रय हा मंगला साबळेचा दुसरा पती होता असं समोर आलं होतं, परंतु आता हाती आलेल्या माहितीनुसार दत्तात्रय हा तिचा प्रियकर होता. मंगला विधवा होती तिला पहिल्या नवऱ्यापासून दोन मुलं होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT