Police team at the crime scene in Nasrapur village, Bhor taluka, following a tragic incident involving a minor girl. saam tv
क्राईम

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Minor Girl Physical Abused in Pune: भोरमधील नसरापूर गावात एका ४ वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून तिची हत्या झाली आहे. या संतापजनक घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

Akshay Badve

  • भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये धक्कादायक घटना

  • ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचारानंतर हत्या

  • परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेल्या एका ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली. ही संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुर गावात घडली आहे. ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला सुट्टीनिमित्त तिच्या आजीकडे राहण्यासाठी आली होती. शुक्रवारच्या दुपारी नसरापूर राम मंदिर परिसरात खेळत होती. त्यावेळी नराधमाने तिला आमिष दाखवून तेथून जवळच असलेल्या एक गुरांच्या गोठ्यात नेऊन निर्दयीपणे अत्याचार केला, त्यानंतर तिचा खून केला.

बऱ्याच वेळा झाला तरी मुलगी घरी आली नसल्याने चिमुरडीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेतला. परंतु मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यात चिमुरडी मुलगी एका व्यक्ती सोबत गोठ्यात जाताना दिसली, यावरून त्या भागात कुटुंबियांनी शोध घेतला. त्यावेळी त्यांना गोठ्यामध्ये झाकलेले अवस्थेत तिचा मृतदेह आढळला.

यावरून नागरिकांनी ज्या व्यक्ती बरोबर ती गेली होती, त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावाच्या परिसरात आरोपीचा शोध घेण्यात आला. तो गावच्या नदीकडील भागात सापडला त्याला पकडण्यात आले आहे. त्याला पकडून आणल्यानंतर मुलगी कुठे आहे तू काय केलं, असे विचारले असता त्याने मी काही केले नाही? असे उत्तर दिले.

दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. या संतापजनक घटनेमुळे समस्त नसरापूर मधील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी मृतदेह हलवण्यास नकार देऊन सदर नराधमास ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावे आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी करत. पोलिसांना अडवून धरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

SCROLL FOR NEXT