Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News : कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच खात्मा; 10 जणांवर गुन्हा दाखल

Killing Leader of Koyta Gang : स्वत:चे वर्चस्व निर्माण करू पाहत होता. त्याच्यासह पुण्यात अन्य काही टोळ्यांचा देखील सुळसुळाट आहे. श्रेयवादाच्या या लढाईतूनच अविनाशची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Ruchika Jadhav

Pune Crime News :

पुण्यात कोयता गँगची मोठी दहशत पसरली आहे. अशात शनिवारी खळबळजनक घटना घडली. पुण्यातील इंदापूरमध्ये कोयता गँगचा म्होरक्या असलेला अविनाश धनवेची कोयत्यानेच हत्या करण्यात आली. अविनाश आळंदीमध्ये कोयता गँगचा म्होरक्या होता. सदर घटनेनंतर अविनाशच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

आधी गोळ्या झाडल्या मग कोयत्याने वार

पुणे- सोलापूर रष्ट्रीय महामार्गावर इंदापूर बाह्यवळण येथे जगदंब नावाचे हॉटेल आहे. शनिवारी रात्री ८ वाजता अविनाश आणि त्याच्यासह अन्य काहीजण जेवणासाठी आले होते. यावेळी जेवत असताना दोन तरुण हॉटेलमध्ये शिरले. कुणाला काही कळण्याआधीच त्यांनी अविनाशवर गोळ्या झाडल्या. अविनाश खाली पडल्यानंतर त्यांनी कोयत्याने त्याच्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या केली. सदर घटनेचा थरार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अविनाशच्या पत्नीने या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली. दोन जण अविनाशला घरी बोलवालया आले होते. तो त्यांच्यासोबत बाहेर गेल्यावर कट रचून त्याची हत्या करण्यात आली आहे. असं पत्नीने म्हटलं. तसेच तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांना खुशाल तापकिर, विशाल तापकिर, मयुर पाटोळे, राहुल चव्हाण, देवा सुतार, मयुर मानकर, शिवा बेडेकर, प्रकाश उर्फ पप्पु बनकर, सतिष पांडे, प्रणिल उर्फ बंटी मोहन काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अविनाशने स्वत:ची वेगळी टोळी निर्माण करत कोयचा गँग बनवली. यामधून तो नगरिकांमध्ये दहशत पसरवत होता, तसेच परिसरात स्वत:चे वर्चस्व निर्माण करू पाहत होता. त्याच्यासह पुण्यात अन्य काही टोळ्यांचा देखील सुळसुळाट आहे. श्रेयवादाच्या या लढाईतूनच अविनाशची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Maharashtra Civic Polls: राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर?निवडणुकांचा मुहूर्त मार्च 2026 नंतर ?

Maharashtra Live News Update: DRI मुंबईची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 1.718 किलो कोकेन जप्त

Vinod Tawde Bihar Role: बिहारच्या विजयामागे मराठी चेहरा, एनडीएच्या विजयाचे शिल्पकार तावडे?

बिहारमध्येही लाडकीचा डंका, बिहारची लाडकी गेमचेंजर?

SCROLL FOR NEXT