Pune Crime News Saam Digital
क्राईम

Pune Crime News: पतीला होता चारित्र्याचा संशय, पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे

Pune Crime News: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. ४५ वर्षीय पतीने पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील उत्तमनगर घडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Crime News

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. ४५ वर्षीय पतीने पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील उत्तमनगरमध्ये घडला आहे. सोमनाथ असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ४१ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ऑक्टोबरपासून सुरू होता. गेल्या २ महिन्यांपासून या दाम्पत्यामध्ये वादविवाद सुरू होते. सोमनाथ हा अनेकवेळा त्याच्या पत्नीवर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात वाद होऊन सोमनाथने त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुद्धा केली होती. काही दिवसांपूर्वी सोमनाथचा भाऊ आणि तो मिळून घरी दारू प्यायला बसले होते. यावरून सुद्धा दोघांमध्ये वाद झाले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून सोमनाथने पत्नीची हत्या करण्याचा कट रचला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथने त्याच्या पत्नीला कॅल्शीअमच्या कॅप्सुल दिल्या पण त्यात आधी ब्लेडचे तुकडे टाकले आणि ते तिला खायला दिले. तसच त्याने तिला जबरदस्तीने ते गिळायला लावले. फिर्यादी यांच्या गळ्यात जखमा झाल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Pune News: पुणेकरांनो आज पाणी जपून वापरा, शहरातील 'या' भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

Ladki Bahin Yojana: लाडकीला जुलै महिन्याचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर, आजच नोट करा

Raksha Bandhan: रक्षाबंधनपासून 3 राशींची होणार चांदीच चांदी; शनी-मंगळ बनवणार पॉवरफुल योग

Success Story: संघर्षाच्या काळात गर्लफ्रेंडने दिली साथ; कोणत्याही कोचिंगशिवाय क्रॅक केली JPSC; अमन कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT