Pune Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : आयुष्यभर सोबत राहायच्या आणाभाका, कुटुंबीयांचा विरोध झुगारून लग्नगाठ बांधली; अवघ्या २ वर्षात संसाराची राखरांगोळी

Pune Crime News : बंगळुरूमध्ये शिफ्ट झालेल्या राकेश आणि गौरी या दांपत्यामध्ये वाद झाला. त्यानंतर राकेशने रागाच्या भरात त्याच्या पत्नीची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि सुटकेसमध्ये भरले.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील रहिवासी असणाऱ्या गौरी सांबेकर या तरुणीची तिच्याच पतीने राकेश खेडेकरने बंगळुरूमध्ये हत्या केली. घरगुती वादात रागाच्या भरात राकेशने गौरीवर चाकूने वार केले. यामुळे गौरीचा मृत्यू झाला. हत्येनंतर राकेशने गौरीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि एका सुटकेसमध्ये भरुन ठेवले. त्यानंतर राकेशने त्याच्या वडिलांना फोन करुन गुन्ह्याची कबुली दिली.

राकेशने गौरीची हत्या केल्याची कबुली फोनवरुन दिल्याची माहिती त्याच्या वडिलांनी, राजेंद्र खेडेकर यांनी दिली. ते म्हणाले, हत्या केल्यानंतर रात्री बारा वाजता माझा मुलगा बंगळुरूहूनc निघाला. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने कॉल करुन गुन्ह्याची कबुली दिली. मला जगायचं नाही, मी सुद्धा आत्महत्या करेन असे तो म्हणाला होता. मी त्याला तसं करु नकोस असे सांगितले होते.

'गौरीची आई माझी सख्खी बहीण आहे, गौरी माझी सख्खी भाची आहे. ती वाद घातले हे आम्हाला आधीपासूनच माहीत होते. दोघांनी लग्न करुच नये म्हणून आम्ही चार वर्षे थांबलो होतो. पण ते दोघेही एकमेकांशी लग्न करण्यावर आडून बसले होते. लग्न करु तर एकमेकांशीच करु, नाहीतर लग्नच करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे आम्ही त्याच्यांसमोर गुडघे टेकले आणि त्याचे लग्न लावून दिले', अशी माहिती राजेंद्र खेडेकर यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

बंगळुरूला शिफ्ट झाल्यानंतर राकेश आणि गौरी यांच्यामध्ये अनेकदा वाद झाले होते. पण हा वाद शिगेला पोहोचून राकेशने गौरीवर चाकूने वार करत तिची हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले. खासगी वाहनाने तो बंगळुरूवरुन मुंबईला येत होता. रस्त्यातच राकेशने झुरळ मारण्याचे औषध आणि फिनेल प्यायले. त्यामुळे तो शिरवळच्या आसपास बेशुद्ध झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT