Pune Crime Saam Tv
क्राईम

Shocking: धक्कादायक! पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या, पुणे शहर हादरले

Pune Crime Husband Killed Wife: पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे

Husband End Life After Killing Wife Pune

पुण्यात (Pune) पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीनं असं पाऊल का उचललं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आपण ही घटना सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक-बे परिसरात ही घटना घडली आहे. सोमनाथ सखाराम वाघ आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ अशी मृतांची नावे (Husband Killed Wife) आहेत. या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख यांनी दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पतीने पत्नीची हत्या केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती- पत्नी रविवारी दुचाकीवरून घरातून बाहेर पडले (Pune Crime News) होते. उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात आले. त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत दुचाकी उभी केली. ते दोघे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलात गेले. त्या ठिकाणी पतीने पत्नीच्या डोक्यात दगड (Husband Killing Wife) घातला. तिची हत्या केली. त्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला. दरम्यान, सकाळी ११ वाजून गेले तरी ते घरी परत आले नाहीत.

वडिलांनी झाडाला गळफास घेतला

हे पती पत्नी दुसऱ्या दिवशीही घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटु लागली. त्यामुळे त्यांची मुलगी व पुतण्याने त्यांचा शोध घेतला. सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात दिसली. त्या परिसरात शोध घेतला असता मुलीला आईचा मृतदेह आढळला. तर वडिलांनी झाडाला गळफास (Husband End Life After Killing Wife) घेतल्याचं दिसून आलं.

या घटनेची माहिती त्यांनी उत्तमनगर पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक युसूफ शेख तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता चौरे, सहाय्यक फौजदार प्रसाद (Crime News) जोशी, कर्मचारी धनंजय बिटले‌ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास करण्यास सुरूवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT