Uttar Pradesh Saam TV
क्राईम

Pune Crime News: आधी अत्याचार मग जेल, जामिनावर बाहेर आल्यावर आरोपीचं पीडितेसोबत भयंकर कृत्य

Crime News: जामिनावर बाहेर आल्यानंतर या नराधमाने पुन्हा पीडितेला त्रास देण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांकडून तरुणावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन असं आरोपीचं नाव आहे.

Ruchika Jadhav

Pune News:

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. प्रेमात व्यक्ती आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला मिळवण्यासाठी काहीही करू शकतात असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र पुण्यात याच प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

एका तरुणाने आपल्याच प्रेयसीवर अत्याचार केला होता. तसेच तिचे सोन्याचे दागिने घेऊन तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर या नराधमाने पुन्हा पीडितेला त्रास देण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांकडून तरुणावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. लखन असं आरोपीचं नाव आहे. आरोपी आणि या तरुणीची गेल्या वर्षी विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली होती. लग्नाचे आमिष दाखवून लखनने या तरुणीवर बलात्कार केला.

तसंच तिच्याकडून ८ लाख रुपयांचे दागिने घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने खडक पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी लगेचच त्यांच्या मुसक्या आवळल्या.

नुकताच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्याने पुन्हा या तरुणीचा पाठलाग सुरू केला आणि तिच्या नकळत तिच्या दुचाकीला 'जीपीएस' लावले व तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरू केले. तसेच तिचा चोरून पाठलाग सुरू केला.

हा प्रकार तरुणीच्या लक्षात येताच तिने पोलीस ठाणे गाठले. गाडीवरील जीपीएस यंत्र काढण्यात आले असून त्यातील सिम कार्डचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT