Pune Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime: गोऱ्हे बुद्रूक परिसरात कोयता गॅंगची दहशत; हल्ला करणाऱ्या चारजणांना अटक, दोन अल्पवयीन ताब्यात

Attack With Koyta In Pune: पुणे शहरातील गोऱ्हे बुद्रूक परिसरात कोयत्याने हल्ला करणाऱ्या चारजणांना अटक करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलं आहे.

Rohini Gudaghe

Pune Crime News

पुणे (Pune) शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत, तरीही गुन्हेगारी आटोक्यात येत नाहीये. बुधवारी गोऱ्हे बुद्रूक परिसरात कोयत्याने हल्ला (Attack With Koyta) झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती. गोऱ्हे बुद्रूक परिसरात कोयत्याने हल्ला करणाऱ्या चारजणांना अटक करण्यात आली आहे. (Latest Crime News)

गुंड टोळक्याने दहशत पसरवत कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना हवेली तालुक्यातील गोऱ्हे बुद्रूक परिसरात (Gorhe Budruk Area) घडली होती. ही घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी हवेली पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. अन्य दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोयत्याने हल्ला केला

गणेश राजू खुडे (वय २४, रा.धायरी फाटा), सोमनाथ गुलाब पवार (वय १९, रा.धायरी), यश चंद्रकांत जावळकर (वय १९, रा. खानापूर ता. हवेली), अनिरुद्ध अमित ठाकूर (वय १९, रा.धायरी), ओंकार संतोष कोळेकर (वय १९, रा.धायरी), हमजा कमरअली शेख (वय २२, रा. धायरी)‌ अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

गोऱ्हे बुद्रूक येथील दरवेश चिकन सेंटर समोर रस्त्यावर या टोळक्याने बुधवारी रात्री कोयता हातात घेऊन परिसरात दहशत माजवली (Pune Crime News) होती.

सीसीटीव्ही फुटेज तपासले

या टोळक्याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नचिकेत संजय जगताप, ऋषिकेश जगताप आणि नीलेश शहा असे तिघेजण जखमी झाले होते. दरम्यान, तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ( Crime News) तपासले. तसेच, जखमींसह साक्षीदारांकडून माहिती घेतली असता आरोपी धायरी परिसरातील असल्याची माहिती मिळाली.

त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात; केमिकलमुळे चक्क रस्ताच झाला गुलाबी, VIDEO

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

SCROLL FOR NEXT