bailgada sharyat, bullock cart race saam tv
क्राईम

Pune Crime: शर्यतीच्या बैल खरेदीवरुन वाद, बारामती तालुक्यात गोळीबाराचा थरार; एक जण गंभीर जखमी

Pune Crime News: बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मंगेश कचरे

पुणे, ता. २८ जून २०२४

बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. निंबुत येथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला.

गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता.. हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते. मात्र याच्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला. रणजित निंबाळकर हे काल मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी जबरदस्तीने बैल नेण्यासाठी आले होते.

यावेळी त्यांचा वाद झाला आणि याच्यातूनच गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झालेत. याप्रकरणी पोलिसांनी गौरव काकडे,सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि मुलगा गौतम काकडे याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत 'परीक्षा'

Maharashtra News Live Update: गुरुपौर्णिमेनिमित्ताने गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, वृक्ष संवर्धनाचा संदेश

Manoj Jarange : फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

SCROLL FOR NEXT