Pune Latest News Saamtv
क्राईम

Pune Crime News : भयंकर घटना! पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पुणे हादरलं

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. १९ फेब्रुवारी २०२४

Pune Breaking News:

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच पुण्यामधून एक हादरवुन टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महेश राजे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी महेश राजे व याप्रकरणी आरोपी हे एकाच परीसरात राहतात. त्या दोघांच्या मध्ये पार्किंग वरून वाद सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद भडकला आणि१० ते १५ जणांच्या टोळक्याने फिर्यादी महेश राजे यांची एक चारचाकी गाडीचे फोडून नुकसान केले.तसेच त्याठिकाणी असलेली एक दुचाकीसुद्धा आरोपींनी पेटवली.

याचवेळी फिर्यादी यांची भाडेकरू महिला देखील त्या ठिकाणी असल्यामुळे तिच्या अंगावर सुद्धा आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने तेथून पळ काढल्यामुळे मोठा अनुचित प्रकार घडला नाही.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, याप्रकरणी महेश राजे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील काही जण रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

येरवडा भागात गाड्यांची तोडफोड..

.येरवडा परिसरात हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा इराद्याने आलेल्या ५ जणांच्या टोळक्याने परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. याबाबत  ४० वर्षीय महिलेने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

Assembly Election: आमदारांमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर, अजित पवारांना हुरहुर?

SCROLL FOR NEXT