Yerwada Jail Crime News  Saam TV
क्राईम

Pune Breaking News: खळबळजनक! खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेला कैदी येरवडा जेलमधून फरार

Pune Yerwada Jail Latest News: खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा जेलमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेने येरवडा जेल प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, ता. १६ जुलै २०२४

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी येरवडा कारागृहातून पळाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने पुणे पोलीस दल आणि येरवडा कारागृह प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा जेलमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्माराम ऊर्फ आत्म्या लाडक्या भवर (वय ३४) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. या घटनेने येरवडा जेल प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आत्म्या लाडक्या भवर हा मूळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील देवीपाडा येथील रहिवासी आहे. त्याने २००९ मध्ये देवीपाडा गावात एकाचा खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी भवरला दोषी ठरवत १० जुलै २०१२ रोजी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

२०१२ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला भवर येरवडा कारागृहातून पसार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या येरवडा जेलमधून मोठ्या गुन्ह्यातील कैदी पसार झाल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT