Pune Crime Saam tv
क्राईम

Pune Crime: पुण्यात नात्याला काळीमा! नराधम भावाचा अल्पवयीन बहिणीवर वर्षभर अत्याचार

Pune Crime: भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना दौंड तालुक्यातील गिरीम येथे घडली‌य. चुलत भाऊच मागील एका वर्षपासून अत्याचार‌ करत होता.

Bharat Jadhav

जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं कोणतं असेल तर ते आहे भाऊ आणि बहिणीचं. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मात्र या पवित्र नात्याला काळं फासलं गेलंय. वासनाधीन एका मुलाने आपल्या अल्पवयीन बहिणीवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. गेल्या वर्षभरापासून नराधम भाऊ बहिणीवर अत्याचार करत असल्याची बाब समोर आलीय.

या शारीरिक अत्याचारातून पीडितेला एक मुलगी सुद्धा झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान याप्रकरणी दौंड पोलिसांनी नराधम भावाला अटक केलीय. ही संतापजनक घटना आहे, अत्याचार प्रकरणात दोन आरोपींचा समावेश आहे. यातील एका आरोपी हा दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथे राहतो तर दुसरा आरोपी हा सिंहगड फाटा येथील रहिवासी आहे.

एका आरोपीचा वायरलेस फाटा येथे आरोपीचा फोटो स्टुडिओ आहे. आरोपींनी या स्टुडिओमध्येच पीडितेवर अत्याचार केला. नराधमाने वर्षभर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. अत्याचार प्रकरणातील एक आरोपी हा पीडितेचा चुलत भाऊ आहे. पीडिता ही अल्पवीयन असल्याचं माहित असूनही तिच्यावर अत्याचार केला जात होता.

नराधम मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत होते. या शरीरसंबंधातून पीडिता गर्भवती राहिली. त्यातून तिला एका मुलगी देखील झाली. मात्र हा घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर पीडितेला आणि तिच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी नराधमांनी दिली. याप्ररकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी दोन्ही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना बारामती विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरक्षक युवराज घोडके करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

SCROLL FOR NEXT