Pune Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime: गर्लफ्रेंड दुसऱ्याच्या प्रेमात पडली, तरुणाची सटकली; गुजरातवरून पुणे गाठलं, १७ वर्षांच्या मुलाला जिवानिशी संपवलं

Pune Police: पुण्यातल्या देहूरोडमध्ये एका १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली प्रेम प्रकरणातून या मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

पुण्यातील देहू रोडमध्ये प्रेम प्रकरणातून १७ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. धारधार चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी गुजरातमधील बडोदरा येथून आरोपीला पोलिसांनी अटक केली. २४ तासांत आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळच्या देहू रोड येथील थॉमस कॉलनीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलगा दिलीप मोरयाची धारदार चाकूने हत्या करण्यात आली होती. आणि त्याच्या चुलत भावाच्या पोटात वारने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला होता. ही घटना गुरुवारी सकाळी देहू रोड पोलिस स्टेशन परिसरात घडली होती. देहूरोड पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत होते. तपासातून ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर आले.

दिलीप आणि त्याचा मारेकरी सनी सिंग राजपूत एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होते. गेल्या तीन महिन्यांपासून या मुलीने सनीशी बोलणे बंद केले होते. ही मुलगी दिलीपच्या संपर्कात होती. आपल्याशी न बोतला ही मुलगी दिलीपच्या संपर्कात असल्याने सनी संतापला. सनी गुजरातमधून देहूरोड येथे आला आणि त्याने दिलीपची हत्या केली. तर दिलीपचा चुलत भाऊ अरुण मोरया या १४ वर्षीय मुलाच्या पोटात चाकूने वार केले.

दिलीपची हत्या केल्यानंतर सनी गुजरातला पळून गेला. दरम्यान पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तेव्हा सनी सिंग राजपूतच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे सनी गुजरातमधील बडोदरा येथील एका स्टील कंपनीच्या गोदामात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवतात आरोपी सनीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल केला. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकाच दिवशी वाढदिवस

Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, राज्यसभा अध्यक्षांची जागा कोण घेणार? वाचा नियम

Ladki Bahin Yojana: ₹१५०० कायमचे बंद, राज्यातील १० लाख लाडकीचे अर्ज बाद, यादीत तुमचेही नाव नाही ना?

Shocking: १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ३ दिवस घरात डांबून ठेवत बलात्कार, VIDEO बनवत...

Horoscope Tuesday Update : जोडीदाराचे म्हणणे आज ऐकाचं, धनलाभ होईल; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT