Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: तुमच्या मुलीला रिझर्व बँकेत नोकरी लावून देतो...; खोटं आश्वासन देत ४१ लाखांवर डल्ला

Crime News: आरोपीने तो इन्कमटॅक्स डिपार्टमेंटमध्ये कमिशनर असल्याचं सांगत फिर्यादी यांना आरबीआयमध्ये पैसे गुंतवले तर दोन कोटी रुपये मिळतील असे सांगितले.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

Pune News:

पुण्यामध्ये फसवणुकीची एक घटना समोर आली आहे. रिझर्व बँकेत किंवा सेबीमध्ये नोकरी लावण्याचा दावा करत एका व्यक्तीची तब्बल ४१ लाखांची फसवणूक झाली आहे. सदर प्ररकरणी पोलिसांनी आरोपी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गौरव पांडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा सगळा प्रकार जानेवारी २०२३ पासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे आणि फिर्यादी यांच्या मुलीची ओळख एका विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झाली होती. आरोपीने तो इन्कमटॅक्स डिपार्टमेंटमध्ये कमिशनर असल्याचं सांगत फिर्यादी यांना आरबीआयमध्ये पैसे गुंतवले तर दोन कोटी रुपये मिळतील असे सांगितले.

तसेच तुमच्या मुलीला रिझर्व बँक ऑफ इंडिया किंवा सेबीमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देतो असे आश्वासन देखील या व्यक्तीने फिर्यादींना दिले. मुलीच्या भवीतव्यासाठी फिर्यादी यांनी वेळोवेळी पांडे यांच्या नावावर पैसे जमा करायला सुरुवात केली. त्यांनी जवळपास ४१ लाख रुपये आरोपी व्यक्तीच्या खात्यावर जमा केले.

मात्र मुलीला नोकरी लागत नसल्याने फिर्यांदींना संशय आला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले.पुण्यातील सिंहगड रोड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT