पुण्यात पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केली
डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप करत निर्घृण हत्या
वारजे टेकडी परिसरात मृतदेह सापडल्याने खळबळ
पुणे पोलिसांनी काही तासांत चार आरोपींना अटक केली
विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने मित्राच्या डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप करुन हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाचे नाव राजेंद्र सुभाष ऐलगच्चे असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना २३ जानेवारी रोजी वारजे येथील आकाशनगर जवळील वन विभागाच्या टेकडीवरील सिमेंटच्या विसाव्या शेजारील निर्जन जागेत एका तरुणाचा मृतदेह मिळाला होता. कोणीतरी तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी मारुन, तसेच दगडाने त्याचा चेहरा ठेचून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शिवाय तपास सुरु करून वारजे पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, गणपती माथा ते शिंदे पुल वारजे दरम्यान दोन संशयित थांबले असून त्यांची काहीतरी गुन्हा केल्याचे त्यांच्या हालचाली व बोलण्यावरुन वाटत आहे. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले आणि दोघांना ताब्यात घेतले़. त्यांच्याकडील माहितीवरुन अन्य दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राजेंद्र ऐलगच्चे यांनी एकाला १८ लाख रुपये दिले होते. ती वसुली करुन देतो, असे सांगून शुभम शिंदे याने ११ लाख रुपये घेतले होते. हे पैसे राजेंद्र ऐलगच्चे मागत होता. राजेंद्र ऐलगच्चे याला संपविले तर, आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही. असे समजून त्याने साथीदारांना मदतीला घेतले़ आणि राजेंद्रचा काटा काढला.
शुभम शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी राजेंद्रना वारजे येथील शनि मंदिर टेकडी येथे २१ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता बोलवले. त्याप्रमाणे राजेंद्र ऐलगच्चे तेथे आले. तेव्हा शुभम व त्याच्या साथीदारांनी लोखंडी हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पायावर वार केले. डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रुप करुन टाकला. या हाणामारीत राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी शुभम राजेश शिंदे (वय २५, रा. ताकवले कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड सिटी), लकी सुरेंद्र सिंग (वय २३, रा. खडकी अॅम्युनेशन फॅक्टरी), सुनिल संतोष खलसे ऊर्फ एस के (वय १९, रा. संभानगर झोपडपट्टी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.