Chakan APMC Market Latest News: Saamtv
क्राईम

Chakan APMC Market: चाकण बाजार समितीत गावगुंडांचा राडा! हप्त्याची मागणी करत शेतकरी, व्यापाऱ्यांना मारहाण; बाजारपेठ बंद

Pune Breaking News: चाकण बाजार समितीत गावगुंडांनी दहशत माजवल्याची घटना घडली आहे. हप्त्याची मागणी करत मध्यरात्री गावगुंडांनी बाजारसमितीत दहशत माजवली.

रोहिदास गाडगे

पुणे, ता. १३ जून २०२४

हप्त्याची मागणी करत चाकण बाजार समितीत गावगुंडांनी दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी आडत व्यापाऱ्यांसह बाजार समिती संचालकांना ५ ते सहा जणांकडून मारहाण करण्याचा आली. या मारहाणीची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाकण बाजार समितीत गावगुंडांनी दहशत माजवल्याची घटना घडली आहे. हप्त्याची मागणी करत मध्यरात्री गावगुंडांनी बाजारसमितीत दहशत माजवली. तसेच अडत व्यापाऱ्यांना पाच ते सहा जणांकडून बेदम मारहाण झाल्याचे समोर आले आहे. ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे रात्री बाजार समिती परिसरात येऊन या गुंडांनी शेतकऱ्यांना धमकावले होते. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्यांना पहाटे सोडून दिल्याने या गावगुंडांनी पुन्हा बाजारसमितीत राडा घातला.यावेळी दगड, काठी कोयत्यांनी दहशत माजवत त्यांनी शेतकरी- व्यापाऱ्यांना मारहाण केली.

या घटनेमुळे शेतकरी तसेच व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गुंडाच्या या दहशतीमुळे चाकण बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय आडते आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तसेच गावगुंडाचा बंदोबस्त करा अन्यथा बाजारसमिती बंद इशारा देण्यात आला आहे. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : आज काय बनवायचं? हा प्रश्न आता कायमचा बंद, 'हा' घ्या तुमच्या महिन्याभराचा मेनू प्लॅन

Kolhapur : दबक्या पावलाने आले अन् कुटुंबासह कुत्र्यावर फवारलं गुंगीचं औषध, कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी लाखोंवर हात साफ केला

Dating App: भयान वास्तव! डेटिंग अ‍ॅपवरचे ६५ टक्के युजर्स विवाहित अन् कमिटेड

Blouse Designs: जाड अन् बारीक अंगानुसार ब्लाऊज कसा निवडायचा?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

SCROLL FOR NEXT