Baramati Young woman molested  Saam Tv News
क्राईम

Pune Crime : तू मला खूप आवडतेस, तू जर नाही म्हणाली तर...; बारामतीमध्ये तरुणीचा विनयभंग

Threatening and Molesting a Young Woman in Baramati : पुण्यातील भवानी पेठेमध्ये बहीण भावाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याचदरम्यान, बारामतीमध्ये देखील एक तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.

Prashant Patil

पुणे (बारामती) : 'तू मला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू मला होकार दे, तू जर नाही म्हणालीस तर मी फाशी घेईन,' असं म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पुण्यातील बारामतीत घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आदित्य साळुंके (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीने नमूद केल्यानुसार २२ जानेवारी ते २६ एप्रिल या कालावधीत सोमेश्वरनगरमधील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. फिर्यादी तरुणी महाविद्यालयात अभ्यास करत असताना आदित्य साळुंके याने तिच्याजवळ जात तिच्याकडे वाईट भावनेनं पाहिलं. 'तू मला होकार दे,' असं म्हणून त्याने फिर्यादीला त्रास दिला. 'तू नाही म्हणालीस, तर मी फाशी घेईन,' असं सांगत फिर्यादीला ब्लॅकमेल केलं.

तरुणीने त्याला 'माझ्या मागे मागे येऊ नकोस, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, माझ्या मनात तुझ्याविषयी काही भावना नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं. तरीही त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्याच्या भावाला बोलावून घेते असं सांगितले. शिवाय ती दप्तर घेऊन बाहेर पडत असतानाही त्याने तिला जिन्यात अडवले. 'तू माझ्या घरच्यांना याबाबत काही सांगितलं तर मी फाशी घेईन,' अशी धमकीही त्याने दिली.

त्यामुळे तरुणीने तिच्या घरी हा प्रकार सांगितला आणि पोलीस ठाण्यात जात फिर्याद दाखल केली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडालीये. गेल्या काही दिवसांपासून हा तरुण मुलीला त्रास देत होता. हेच नाही तर तिने सांगूनही तो तिच्या मागे मागे जात होता. त्याने फाशी घेण्याची धमकी दिल्यानंतर तरुणीने घडलेला सर्व प्रकार हा तिच्या घरी सांगितला. यानंतर पोलिसांनी विनभंगाचा गुन्हाही दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रासाठी दोन दिवस धोक्याचे, कोणत्या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट? पाहा VIDEO

IAS Transfer : शेतकरी राजा संकटात असताना IAS अधिकाऱ्याची बदली, नवी नियुक्ती कुठे?

एकनाथ शिंदेंचा छत्रपती संभाजीराजेंना धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याला फोडलं, राजकीय वर्तुळात चर्चा

Bank Holidays: दसरा ते दिवाळी, ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद? वाचा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

SCROLL FOR NEXT