Pune Raid Saam TV
क्राईम

Pune Raid : पुण्यात पुन्हा मोठी कारवाई; छापेमारीत १५० कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज पकडले

Pune Drugs Racket: ८० किलो पेक्षा आधिक ड्रग्सची किंमत जवळपास १५० कोटी रुपयांच्या घरात आहे. पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूच आहे. अशात आता पोलिसांनी आज पुन्हा एकदा मोठी छापेमारी केली आहे.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

Pune Police Drugs Racket busted :

पुणे शहरात आज पुन्हा मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त करण्यात आलेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. विश्रांतवाडी भागातून ८० किलोहून अधिक एमडीड्रग्स जप्त करण्यात आलेत.

८० किलो पेक्षा आधिक ड्रग्सची किंमत जवळपास १५० कोटी रुपयांच्या घरात आहे. पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूच आहे. अशात आता पोलिसांनी आज पुन्हा एकदा मोठी छापेमारी केली आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये उडता पंजाबप्रमाणे चित्र निर्माण झालं आहे. वारंवार ड्रग्सचं मोठं रॅकेट समोर येत असल्याने पुणे शहराला उडता पुणे म्हणण्याची वेळ आली आहे.

विश्रातवाडीमध्ये एक साठा जप्त करण्यात आला होता. आरोपीकडून याबाबतच चौकशी सुरू असताना एका ट्रकमध्ये ३४० किलो एमडी बनवण्यात येणारे रॉ मटेरियल असल्याचे समजले. त्या माहितीनूसार छापा टाकून एमडी ड्रग्सचे रॉ मटेरिएल जप्त करण्यात आलेत. सदर प्रकरणी एकूण ९ आरोपींची नावे समोर आली आहेत.

पोलिसांनी चौकशीतून मिळालेल्या माहितीमधून आपली कामगीरी चोख बजावलीये. ड्रग्जबाबत अधिक तपास सुरू आहे. ही एक सप्लाय चेन होती. त्यामुळे या प्रकरणी अनेकजण रडावर आहेत. यातील ड्रग्ज परदेशी पाठवलं जात होतं, आता याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT