Sangli Crime धक्कादायक सांगलीत मालमत्तेच्या मोहापामुळे नातजावयाकडून खूण.jpg saam tv
क्राईम

Sangli Crime: धक्कादायक! सांगलीत मालमत्तेच्या मोहामुळे नातजावयाकडून खूण...बनाव रचत सासूचा काढला काटा

Sangli Property Dispute: मालमत्तेच्या मोहापायी नातजावयाने आपल्याच सासूची निर्घृणपणे हत्या केली. पण एका चुकीमुळे जावयाचे बिंग फुटले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Shruti Vilas Kadam

Sangli Crime: संपत्ती, पैशांसाठी सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नात जावयाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव राजेश गायकवाड असे आहे. तर मृत महिलेचे नाव मालन जाधव असे आहे. राजेश याने सासू मालन हिची हत्या करून बनाव रचला. पण एका चुकीमुळे त्याचं बिंग फुटले. सांगलीतील आटपाडीत नेमकं झालं काय? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आरोपी राजेशला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एका नातजावयाकडून वृद्ध सासूचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालमत्तेच्या वादातून नात जावयाने खून केल्याचं समोर आले आहे.. याप्रकरणी नातजावई राजेश गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.सुरुवातीला चोरांनी लुटमार करताना, मारहाण करून मालन जाधव,वय ८३ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव रचला होता.

मृत महिला नाव मालन जाधव या पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी घरातून बाहेर गेल्या होत्या परत घरात येत असताना आरोपीने पाठीमागून धक्का देत पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिले.

गंभीर जखमी झालेल्या जाधव यांच्यावर उपचार सुरू होते,जखमी जाधव यांनी त्यांच्या एका मुलाला सदर घटनेबाबतचे हकीकत सांगितली होती,मात्र जबाबापूर्वी जाधव यांचा मृत्यू झाला.दरम्यान मिळालेली माहिती व पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला असता,काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने सखोल तपास केला असता, मालमत्तेच्या वादातून नात जावयानेच वृद्ध सासूचा खून केल्याचं पोलीस तपासात उघडकिस आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली आहे.

Maheshwari Saree Designs: महिलांसाठी महेश्वरी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, या 5 डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील

मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीच्या सरपंचासह ५ सदस्यांचे पद रद्द; अतिरिक्त विभागीय आयुक्तांचे आदेश

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

SCROLL FOR NEXT