shocking news  saam tv
क्राईम

Crime News: शाळेच्या प्रयोगशाळेत टॉपचा बेडरुम, मुख्याध्यापक करायचा भलताच प्रयोग; महिला शिक्षकेसोबतचा VIDEO व्हायरल

Principal Turns School Lab Into Bedroom: मुख्याध्यापकाने चक्क प्रयोगशाळेलाच बेडरूम बनवून तेथे एका शिक्षिकेसोबत शारीरिक संबंध ठेवायचा हा सर्व प्रकार शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Omkar Sonawane

बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील महुआ येथील हरपुर मिर्झानगर उच्च माध्यमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक हेमंत कुमार यांना त्यांच्या एका सहकारी शिक्षिकेसोबतच्या नको ते वर्तन केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार ई-शिक्षा कोष पोर्टलवर पुराव्यानिशी करण्यात आली होती. यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी शशि रंजन यांनी तत्काळ कारवाई करत हेमंत कुमार यांना निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच ही चौकशी ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सीसीटीव्हीमध्ये कैद व्हिडिओनंतर उघड झाली बाब

प्रकरणात मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांचा नको ते चाळे करण्याचा एक व्हिडिओ सीसीटीव्हीत आढळून आला, ज्यात शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये बेड ठेवलेला दिसून आला. त्यामुळे प्रयोगशाळेचा वापर शाळेच्या उद्देशाला न धरून भलत्याच कारणासाठी केला जात असल्याचा संशय निर्माण झाला. प्रयोगशाळेच्या चाव्या मुख्याध्यापकांकडेच असल्याची माहिती नाईट चार्जने दिली.

शाळेतील शिक्षकांनी याबाबत बोलण्यास टाळले

जवळपास सगळ्या शिक्षकांनी चौकशीदरम्यान काहीही बोलण्यास नकार दिला. प्रखंड शिक्षाधिकारी अर्चना कुमारी यांनी शाळेची पाहणी केली आणि यावरून शाळेतील वातावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

शिक्षिकेवरही होणार कारवाई

फक्त मुख्याध्यापकच नव्हे, तर संबंधित शिक्षिकेवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. शाळेच्या वातावरणाला दूषित करण्याच्या तसेच प्रयोगशाळेमध्ये बेड आढळून आल्याने आणि तेथे नको ते पराक्रम केल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांचे निधन

Famous Actress : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

आता जमिनीची वाटणी होणार मोफत, फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

SCROLL FOR NEXT