Prabhadevi Railway Station Saam TV
क्राईम

Prabhadevi Railway Station: गर्दीत अनोळखी व्यक्तीने तरुणीचा हाथ पकडला अन्...; रेल्वे स्थानकातील घटनेनं महिलांमध्ये भीती

Ruchika Jadhav

Prabhadevi Railway Station:

महिलांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. मात्र आद्यापही महिला पूर्णता सुरक्षित नाहीत. रेल्वे स्थानक म्हणजे भरपूर गर्दी असलेलं ठिकाण, मात्र इतक्या गर्दीच्या ठिकाणी देखील एका तरुणीसोबत गैरवर्तन करण्यात आलंय. एका पत्रकाराने आपल्या ट्वीटर अकाउंटवर याबाबत माहिती आणि संबंधित व्यक्तीचे पोस्ट केलेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जीत मश्रू यांच्या ट्वीटनुसार, बुधवारी रात्री ९.१५ वाजता ही घटना घडलीये. विरार बाजूच्या महिला डब्याजवळील बाकावर एक पुरुष बसला होता. याच बाकावर एक तरुणीही बसली होती. तरुणी बसलेली असताना या व्यक्तीने अचानक तिचा हाथ पकडला आणि तू माझ्यासोबत चल असं तो म्हणू लागला.

यावर तरुणी फार घाबरली आणि त्या बाकावरून उठून दूर उभी राहिली. जीत यांनी ही घटना पाहिली होती. त्यांनी त्या तरुणीजवळ जाऊन ती या व्यक्तीला ओळखते का? तो तिच्या ओळखीचा आहे का? अशी विचारपूस केली. त्यावेळी मी त्याला ओळखत नसल्याचं तरुणीने सांगितलं. जीत या तरुणीसोबत बोलत होते तेव्हा बाकावर बसलेल्या व्यक्तीने त्या तरुणीकडे बोट दाखवत 'परत बोलू नको मग तू...', असं म्हटलं.

पत्रकार जीत यांनी या व्यक्तीचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. काहीवेळाने तो व्यक्ती तेथून निघून गेला. पत्रकारांनी आपल्या ट्वीटला @rpfwrbct @grpmumbai यांना टॅग केलंय. तसेच या घटनेचा गांभीर्याने विचार करत दक्षता वाढवा, असं लिहिलं आहे.

घटना घडल्यानंतर सदर महिला तेथून निघून गेली होती. त्यामुळे जीत यांनी हेल्पलाइनवर कॉल केला नाही आणि तक्रारही दाखल केली नाही. मात्र सुरक्षा आणि वाढीव दक्षता रोखण्यास मदत करेल, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये शेवटी लिहिलंय.

आरपीएफ मुंबई मध्य विभाग रेल्वेनेही या बाबात ट्वीट केलंय. 'तुमच्या तक्रारीची रेल्वेला काळजी आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून नियमन करण्यासाठी पुरेसा गणवेशधारी फौजफाटा रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आला आहे. सुमारे २०० एमएसएफ कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. कर्मचार्‍यांनी सतर्क राहून असे गैरकृत्य करणाऱ्यांबाबत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT