manoj jarange Saam TV
क्राईम

Dharashiv News: मनोज जरांगे यांच्या सभा आयोजकांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Dharashiv News: पोलिसांनी आयोजक संदीपान कोकाटे आणि आप्पासाहेब देशमुख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Vishal Gangurde

बालाजी सुरवसे

Dharashiv News:

धाराशिवात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सभा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजक संदीपान कोकाटे आणि आप्पासाहेब देशमुख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही कार्यकर्त्यांनी भुम तालुक्यातील ईट गावात सभा आयोजित केली होती. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश दिले होते. मात्र, तरीही मनोज जरांगे यांच्या सभेचे आयोजन केल्याने पोलिसांकडून दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम १८८ सह मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्ववये वाशी पोलिसांत गुन्हा नोंद केला आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे राज्यभरात सभा घेत संवाद साधत आहे. जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

धाराशीवमध्ये मनोज जरांगे यांच्या सभेच्यादिवशी रात्री 22.00 ते 23.05 पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले होते. त्यानंतरही धाराशिवमधील वा. सु. हायस्कुल कन्या प्राथमिक शाहा ईट या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आयोजकांनी दिलेली वेळ पाळली नाही. त्यामुळे आयोजकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन झालं. त्यानंतर पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेवी हत्तीणी प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार

Today Gold Rate: रक्षाबंधनानंतर सोन्याचे दर ७६०० रुपयांनी घसरले; १० तोळ्याचा आजचा भाव किती?

Chhatrapati Shivaji Terminus: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे आधीचे नाव काय होते? वाचा इतिहास

Radha Ashtami 2025 : राधा अष्टमी २०२५ कधी आहे? जाणून घ्या पूजा, मुहूर्त व महत्त्व

Mumbai Local : बदलापुरातून पनवेलला ३० मिनिटात लोकलने जा, रेल्वेचा जबरदस्त प्लॅन, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT