police charged 7 along with prahar sanghatana president vaibhavraje mohite buldhana  saam tv
क्राईम

Prahar Sanghatana News : प्रहार संघटनेच्या जिल्हाप्रमुखासह सात जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या जाचाला कंटाळून डेअरी मालकाने धाड परिसरातील दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे धाव घेतली.

संजय जाधव

Buldhana News :

बुलढाणा जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहितेसह (prahar sanghatana vaibhavraje mohite) सात जणांवर खंडणीसह विविध कलमान्वय गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील अमर दूध डेअरीचे मालकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे सुशोभीकरणासाठी वैभवराजे मोहितेसह सात जणांनी 11 लाखाची खंडणी मागितल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.  (Maharashtra News)

बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील अमर दूध डेअरीचे मालकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे सुशोभीकरण करायचे आहे म्हणून 11 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. हे पैसे मालकाने देण्यास नकार दिला असता प्रहार संघटनाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते आणि सहकाऱ्यांनी डेअरीमध्ये जाऊन आणि बोदवड येथे डेअरी मालक यांचे घरी जाऊन धिंगाणा घातला. त्याशिवाय दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर सोडून देण्याची धमकी दिली.

यामुळे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या जाचाला कंटाळून डेअरी मालकाने धाड परिसरातील दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आपले नुकसान होणार असल्याने याविरोधात शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या शेतक-यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खंडणीखोरांवर कारवाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा तत्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले. दरम्यान पाेलिसांनी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहितेसह सात जणांवर खंडणीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT