police charged 13 directors and two workers from khamgaon krushi utpanna bazar samiti Saam Digital
क्राईम

Buldhana: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांसह, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

police charged 13 directors along with workers from khamgaon krushi utpanna bazar samiti : खामगाव शहर पोलिसांत सर्व संचालकांवर (कलम 420 , 409 ,477 (अ ) व 34) भारतीय दंड विधान नुसार गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

संजय जाधव

आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 13 संचालकांसह दाेन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. खामगाव पाेलिसांनी विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व संचालकांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेण्यासाठी सम्यक साक्षी सेक्युरिटी अँड लेबर कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांवर दबाव आणला होता. सुरक्षारक्षक पुरवलेले नसतानाही देयकांवर सह्या घेऊन पदाचा गैरवापर करून जवळपास 32 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीत उघडकीस आला आहे.

राहुल बुध्दम अबगड यांनी दिलेल्या फिर्यादी नूसार पाेलिसांनी गणेश संभाजी माने, गणेश मनोहर ताठे, श्रीकृष्ण महादेव टिकार, विलासराव सुभाषसिंग इंगळे, प्रमोद शामराव चिंचोलकर, संजय रामेश्वर झुनझुनवाला, मंगेश इंगळे, सचिन नामदेव वानखेडे, किंमत रामा कोकरे, सौ. सुलोचना श्रीकांत वानखडे, सौ. वैशाली दिलीप मुजुमले, गजानन आमले, प्रशांत जाधव, विजय इंगळे , गिरीष सातव (सर्व राहणार - कृषी उत्पन्न बाजार समिती खामगांव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खाबलकर हे करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT