kalyan police arrests two from other state in maharashtra dacoit case saam tv
क्राईम

Kalyan Crime News : महाराष्ट्रासह तेलंगणात घरफोडी दोघे गजाआड, कल्याण महात्मा फुले पोलिसांची कामगिरी

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश शाळवी यांनी या तपासासाठी पोलिसांचे पथक नेमले होते.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan :

महाराष्ट्रसह तेलंगणामध्ये घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अविनाश धनाजी शिंदे आणि सॅमसंग डॅनियल अशी चोट्यांची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या दोघांविरोधात महाराष्ट्रसह इतर राज्यात विविध पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. (Maharashtra News)

कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. त्यातच 27 फेब्रुवारीला सांगळेवाडी परिसरात हेमंत सांगळे यांच्या घरी घरफोडीची घटना घडली होती . या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश शाळवी यांनी या तपासासाठी पोलिसांचे पथक नेमले होते.

पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करीत चोरट्यांना पकडण्याकरीता विविध ठिकाणी सापळा रचला होता. अंबरनाथ येथील दत्तकुटीर परिसरात पोलिसांच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात सराईत चोरटा अविनाश शिंदे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

अविनाश त्या ठिकाणाहून पळून जाण्याच्या भेतात होता त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याला या घरफोडीच्या कामात साथ देणारा साथीदार सॅमसंग रुबीन डॅनियल याची माहिती दिली.

सॅमसंग हा कल्याणच्या बेतूरकरपाड्यात राहत असल्याची माहिती मिळताच त्यालाही अटक केली. हे दोघेही राज्यातील कल्याण, जळगाव याठिकाणासह तेलंगणा राज्यातही घरफोडी करीत होते. त्यांनी १२ घरफाेडीचे गुन्हे केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्य आरापी सॅमसंग याच्या विरोधात ९ गुन्हे दाखल आहेत १२ गुन्ह्यातील ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यातील अविनाश हा चोरी केलेला माल सॅमसंग याच्याकडे देत होता. सॅमसंग हा त्या मुद्देमालाची विल्हेवाट लावत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT