police arrests grand mother for selling girl in sambhajinagar Saam TV
क्राईम

Sambhajinagar Crime News : सख्या चुलत आजीने 4 वर्षाच्या नातीला कोपरगावात 5 हजारात विकले; आजीसह दोन महिलांना अटक

दरम्यान याची मुख्य मुलीच्या आईने दुसरा विवाह केल्याने ही मुलगी आपल्या आजीकडे राहत होती. मात्र आजीकडूनच या नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडालीय.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर मध्ये एका 4 वर्षाच्या नातीला सख्या चुलत आजीने 5 हजारात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत अवघ्या 12 तासात आजीला अटक केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनूसार आजीने मुलीला तुझी आई आली आहे तिच्याकडे जाऊ या. आपण आईस्क्रीम खाऊ असे सांगून तिचे पैशाच्या हव्यासापोटी अपहरण केले. त्यानंतर तिला 5 हजार रुपयांमध्ये काेपरगावच्या महिलेला विकले. (Maharashtra News)

या प्रकरणी सलीमा बेगम अजिज खान आणि अलका काशिनाथ उलाळे या आरोपींना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. दरम्यान मुलीला तिच्या मामाकडे सोपवले. धक्कादायक माहिती अशी की मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशिनाथ उल्हाळे हिने मुलीची चुलत आजी सलीमा बेग अजीज खान तिच्याकडून तिला विकत घेतले. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत अवघ्या 12 तासात या महिलेला व आजीला अटक केली.

दरम्यान याची मुख्य मुलीच्या आईने दुसरा विवाह केल्याने ही मुलगी आपल्या आजीकडे राहत होती. मात्र आजीकडूनच या नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडालीय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT