Pimpri Chinchwad News Saamtv
क्राईम

Pimpri Chinchwad Crime: गावगुंडांचा राडा, मध्यरात्री १० ते १५ वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये दहशत

Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमधील पिंपळेगुरवमध्ये गुंडांनी हैदोस घातल्याचे पाहायला मिळाले. मयूरनगरी परिसरामध्ये टोळक्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली.

गोपाल मोटघरे

पुणे, ता. १५ सप्टेंबर २०२४

Pimpri Chinchwad Vehicle Vandalized: पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शहरात, कोयता गँगची दहशत, मारामाऱ्या, खूनाच्या घटनांनी कळस गाठला आहे. अशातच पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवीमध्ये गावगुंडांनी मध्यरात्री गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमधील पिंपळेगुरवमध्ये गुंडांनी हैदोस घातल्याचे पाहायला मिळाले. मयूरनगरी परिसरामध्ये टोळक्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली. काल रात्री गावगुंडांच्या टोळक्याने दुचाकी आणि चार चाकी वाहनांची मोठ्या तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या तोडफोडीत जवळपास पंधरा ते वीस वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत अधिक तपास सुरु असून अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असतानाच घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

दरम्यान, पिंपळे गुरव परिसरातील देवकर चौक या ठिकाणी गाव गुंडांच्या टोळक्याने हातात कोयते आणि दगड घेऊन जवळपास दहा-पंधरा वाहनांची तोडफोड केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गावगुंडांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली आहे. ज्या ठिकाणी वाहनांची तोडफोड झाली त्या ठिकाणी सांगवी पोलीस दाखल झाले आहेत. वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांच सांगवी पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT