Kalyan Crime News Saam Tv
क्राईम

Kalyan News: कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सराईत गुन्हेगार गजाआड

Kalyan Crime News: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीला स्कूटरवर घेऊन जाऊन सराईत गुन्हेगाराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे अल्पवयीन मुलीला स्कूटरवर घेऊन जाऊन सराईत गुन्हेगाराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.

या प्रकरणी कल्याण कोलशेवाडी पोलीस ठाण्यात आशिष या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आशिष हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आशिष विरोधात या आधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण परिसरात राहते. गुरुवारी याच परिसरात राहाणारा आशिष हा तरुण तिला स्कूटरवर बसवून घेऊन गेला. तिला एका इमारतिच्या आडोशाला नेत कुटुंबाला मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीने रात्री घरी आल्यानंतर कुटूंबियांना घडला प्रकार सांगितला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आशिष विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आशिष हा या परिसरातील सराईत गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याण पूर्वेत झालेल्या गाड्यांच्या तोडफोड प्रकरणात देखील आशिषचा सहभाग होता. पोलिसांनी आशिषला अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विधानसभेच्या पराभवानंतर पवारांचे खच्चीकरण झालेय - राज्यमंत्री

Tejashree Pradhan- कितीदा नव्याने तुला आठवावे...

Mumbai To Sangli: मुंबईहून सांगलीपर्यंत कोणत्या मार्गाने प्रवास करावा? जाणून घ्या अंतर आणि सोपे मार्ग

फॅटी लिव्हरला बरं करायचंय? मग लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

Weigh Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? वाचा माहिती

SCROLL FOR NEXT