Kamothe News Saam Tv
क्राईम

Kamothe News: दीड लाखांचा आयफोन घ्यायला वडिलांनी नकार दिला; १८ वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल, पनवेलमधील घटना

Kamothe Crime News: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका १८ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. आयफोन न घेतल्याच्या रागातून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

Siddhi Hande

नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. आयफोन घेण्यास वडिलांनी नकार दिला म्हणून एका १८ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. सोमावारी संध्याकाळी कामोठे येथे ही घटना घडली आहे. आपल्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळळा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाला आयफोन घ्यायचा होता. त्याची किंमत १.५ लाख रुपये होती. मात्र, त्याच्या वडिलांनी आयफोन घेऊन दिला नाही. त्याच रागातून त्याने त्याने हो टोकाचे पाऊल उचलले. किशोर असे मृत मुलाचे नाव आहे.

घडलेल्या घटनेबाबत कामोठेचे सिनियर इन्स्पेक्टर अजय कांबळे यांनी माहिती दिली आहे. किशोरने शाळा अर्धवट सोडली होती. किशोल मित्रांच्या संगतीमुळे ड्रग्जच्या आहारी गेला होता. किशोरने त्याच्या वडिलांकडे नवीन आयफोन घेण्याची मागणी केले होती. मात्र, दीड लाखाचा फोन घेण्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्याने त्यांनी आयफोन घेतला नाही. त्यामुळेच त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोरच्या वडिलांचा सिमेंटचा व्यवसाय होता. आयफोन हा खूप महाग होता म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला दुसऱ्या कंपनीचा कमी किंमतीचा स्मार्टफोन घेऊन दिला. मात्र, त्यामुळे मुलगा खूप असवस्थ झाला आणि त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मुलगा गेल्याने आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT