pandharpur Assault Case SAAM TV
क्राईम

Crime News: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; व्हिडिओ काढले, ब्लॅकमेल आणि टॉर्चर केलं, अखेर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Pandharpur Assault Case: पंढरपूर अत्याचार प्रकरणात विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असूनही तो मोकाट असल्याचा आरोप पीडितेच्या परिवाराने केला आहे.ॉ

Shruti Vilas Kadam

Pandharpur Assault Case: महाबळेश्वर येथे एका इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर त्रस्त झालेल्या पीडित विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही इंदापूर येथील इंजिनिअरिंगंच्या महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. परीक्षा संपल्यानंतर ती गावी आली होती. १४ सप्टेंबर २०२५ रोजी ती इंदापूरला जाण्यासाठी बसस्थानकावर उभी असताना आरोपी आतिष पांडुरंग ताटे तिथे आला. कॉलेजमध्ये सोडण्याच्या बहाण्याने त्याने तिला कारमध्ये बसवले आणि महाबळेश्वर येथे एका हॉटेलमध्ये नेले.

तिथे आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये पुन्हा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने ८ मे रोजी घरातच अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे, सोलापूर आणि पंढरपूर येथे उपचार केल्यानंतर सध्या करकंब येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपचारासाठी मोठा खर्च झाला असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी पीडितेच्या आईने करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच सुरुवातीला पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू करुन आरोपीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्पात भीषण अपघात; क्रेन प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

IED Blast: शक्तिशाली स्फोटात डीआरजीचे ३ जवान शहीद; नक्षलवाद्यांनी घडवून आणला हल्ला

Mango Side Effects: आंबे खाल्याने पिंपल्स येतात? डाएटिशियनने सांगितला हा घरगुती उपाय

Amruta Khanvilkar Saree Photos : निळ्या रंगाच्या साडीत अमृता खानविलकरचा मराठमोळा साज, लाईक्सनी न्हाऊन निघाला सोशल मीडिया

Trending Hairstyles On Saree: साडीवर करा 'या' ५ सोप्या हेअरस्टाईल

SCROLL FOR NEXT