Husband Killed Wife  Google
क्राईम

Palghar News: बायकोला संपवलं मग केला आत्महत्येचा बनाव, नातेवाईकांनाही बोलावलं; नवऱ्याचं क्रूरकृत्य पोस्टमार्टममधून उघड

Husband Killed Wife In Boisar: पालघर जिल्ह्यात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर त्याने पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा बनाव केला होता.

Rohini Gudaghe

Palghar Crime News

पालघर (Palghar) जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती भांडणानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर पत्नीने आत्महत्या केली असं म्हणत त्याने पोलिसांची दिशाभूल केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळं दहिसरमध्ये एकच खळबळ उडाली होती.  (Latest Crime News)

कनिस्क सुरेंद्र पाटील या ३५ वर्षीय व्यक्तीने घरगुती वादातून आपली ३२ वर्षीय पत्नी क्रुताली हिचा गळा दाबून खून केला (Husband Killed Wife In Boisar) आहे. नंतर त्याने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ती बेशुद्ध पडली, असं सांगून रुग्णालयात नेलं. शनिवारी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील त्यांच्या घरी ही घटना घडली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पतीने केली पत्नीची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आरोपीचे पत्नीशी घरगुती कारणावरून भांडण झालं (Palghar News) होतं. भांडण टोकाला गेलं आणि आरोपीने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी पहाटे २ ते ५ च्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे.

भांडण झाल्यानंतर आरोपीने डहाणू तालुक्यातील वसगाव येथे राहणाऱ्या क्रुतालीच्या कुटुंबीयांना फोन करून ती बेशुद्ध पडल्याची माहिती (Husband Killed Wife) दिली. दरम्यान, पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं भासवून त्याने पत्नीला बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना कळवलं आणि शवविच्छेदन करण्याची विनंती केली.

आरोपीने दिली खुनाची कबुली

प्राथमिक तपासणीअंती पोलिसांना मृताच्या गळ्यावर खुणा आढळून आल्या. त्यामुळे आरोपीने पत्नीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात (Boisar) आहे. डॉक्टरांकडून मिळालेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की, क्रुतालीचा मृत्यू गुदमरल्यामुळं झाला आहे. एमआयडीसी तारापूर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीनं खुनाची कबुली दिली.

या जोडप्याने २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. ते वेगवेगळ्या जातीचे होते. आरोपीचं बोईसर येथील पास्थल येथे गॅरेज (crime news) आहे. तिथे तो चारचाकी वाहनांची दुरुस्ती करतो. तसंच आरोपी एका राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता आहे. आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. या दाम्पत्याला साडेचार वर्षांचा मुलगा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT