GST Crime News
GST Crime News Saam Tv
क्राईम

GST Fraud News: बनावट जीएसटी नोंदणी मिळवून 31 कोटींची फसवणूक, पालघरमध्ये एकाला अटक

साम टिव्ही ब्युरो

>> हिरा ढाकणे

Palghar Crime News:

बनावट जीएसटी नोंदणी मिळवून सरकारी तिजोरीची 31.06 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीजीएसटी आणि सीई पालघर आयुक्तालयाने एकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 13.39 कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट (आयटीसी) मंजूर करण्याच्या उद्देशाने विविध मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीच्या आधारे बनावट जीएसटी नोंदणी करण्याच्या आणि प्राप्तकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठी 17.66 कोटी रुपयांच्या चुकीच्या आयटीसीचा लाभ घेणाऱ्या टोळीचा पालघर आयुक्तालयाच्या तपास अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार मिश्रीलाल रामधर दुबे उर्फ अब्दुररहमान दुबे उर्फ अकील एच कासमनी याला गेल्या शुक्रवारी (8 मार्च 2024) अटक करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासादरम्यान, मिश्रीलाल रामधर दुबे उर्फ अब्दुर रहमान दुबे उर्फ अकील एच कासम हा त्याच्या वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अंतर्गत विविध बनावट कंपन्या तयार करण्यात आणि बनावट पावत्या तयार केल्या.  (Latest Marathi News)

तसेच भरणा करून बनावट आयटीसी मंजूर करण्यासाठी तयार केलेल्या जीएसटीआयएनएसचा वापर करण्यात तसेच कमिशनच्या आधारावर अशा पावत्यांच्या विविध प्राप्तकर्त्यांना बनावट आयटीसी मंजूर करण्याच्या एकमेव हेतूने जीएसटीआर-1 परतावा भरण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे निदर्शनास आले. या उद्देशासाठी मिश्रीलाल रामधर दुबे एकूण 31 कंपन्या चालवत होता.

तपासादरम्यान गोळा केलेल्या प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे, मिश्रीलाल रामधर दुबे याला 8 मार्च 2024 रोजी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi News | गर्दी गोंधळ आणि एकच राडा! राहुल गांधींच्या 'त्या' सभेत काय घडलं?

Farooq Abdullah: मोठी बातमी! फारुख अब्दुल्ला यांच्या सभेत चाकूहल्ला

Hair Removal Creams: शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रीम वापरताय?

Today's Marathi News Live: अवकाळी पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली

Pune Hit and Run Case | सकाळी अटक दुपारी जामीन! पुणे हिट अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT