online Shopping scams in india google
क्राईम

Online Shopping Scams :ऑनलाईन खरेदी करताय? या ५ गोष्टी ठेवा लक्षात, नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Online Shopping: सणासुदीला आपण सगळेच मोठ्या संख्येने खरेदी करतो. मात्र त्यावेळेस आपाल्याला आर्थिक घोटाळ्यात अडकवून कोणी आपली फसवणूक करतयं का? हे पाहणे खूप महत्वाचे असते. बऱ्याच वेळेस डिजिटल पद्धतीने आपण पेमेंट करतो तेव्हाही आपली फसवणुक केली जावू शकते. नियामक सर्वांसाठी डिजिटल पेमेंट्स सुरक्षित करण्यासाठी e-BAAT आणि RBI Kehta Hai यांसारखे उपक्रम राबवत जागरूकतेचा प्रसार केला जात आहे. पण, असे असूनही फसवणूक झाली तर काय करायचे?

तुमची अशी फसवणूक झाली असेल तर तो धोका कमी करण्‍यासाठी सक्रियपणे कार्य करत #SatarkNagrik बनण्‍याकरिता व्हिसा पाच प्रभावी टिप्‍स सांगत आहेत. त्याचा वापर तुम्ही करु शकता.

१. फक्त अधिकृत कस्टमर केअर सर्विसेसशी संपर्क साधा

तुमची बँक किंवा पेमेंट प्रदात्‍याच्‍या अधिकृत संवादामध्‍ये दिलेल्‍या कस्‍टमर केअर क्रमांकावर संकोच न करता संपर्क साधा. फक्‍त अधिकृतपणे सूचीबद्ध केलेल्‍या कॉन्‍टॅक्‍ट्सशी संपर्क साधा आणि गरज असल्‍यास तुमचे खाते फ्रीज करा किंवा कार्ड/पेमेंट पद्धत ब्‍लॉक करा. यामुळे तुमची अधिक फसवणूक होण्‍याला प्रतिबंध होईल आणि चार्जबॅक किंवा रिफंडसाठी अर्ज करा.

२.विलंब न करता तक्रार करा

त्‍वरित बँकेकडे धाव घ्या. तुम्ही नॅशनल सायबर क्राइम हेल्‍पलाइनवर (डायल १९३०) तक्रार करा. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) (National Cyber Crime Reporting Portal (NCRP))वर किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा आणि तक्रारीची प्रत सोबत ठेवा.

३. प्रत्येक तपशीलाची माहिती ठेवा

या घोटाळ्यादरम्यान गोंधळून जावू नका किंवा घाबरु नका. फसवणूक झाल्‍याचा संशय येताच तपशील व डॉक्‍यूमेंट्स अशी सर्व महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवा, संवाद रेकॉर्ड करा, स्क्रिनशॉट्स काढा, मेसेज कॉपी करा. तसेच फसवणूक करणाऱ्यांना तुम्‍ही शेअर केलेले व्‍यवहार आयडी, तारीख, रक्‍कम इत्‍यादी कॅप्‍चर करा. या माहितीचा उपयोग तुम्हाला तक्रारीसाठी फायदेशीर ठरेल.

४. सिक्‍युरिटी अपग्रेड करा

पासवर्ड्स अपडेट करत प्रबळ व युनिक करा आणि तुमची सुरक्षितता वाढवा, टू-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन कार्यान्वित करा आणि अॅण्‍टी-मालवेअर इन्‍स्‍टॉल करा, जे नियमितपणे तुमच्‍या डिवाईसचे स्‍कॅन करू शकते. हे सर्व केल्‍यानंतर प्रबळ सुरक्षितता उपायांसह पेमेंट पर्याय निवड, जसे टोकनायझेशन, जे आरबीआयने ऑनलाइन व्‍यवहारांसाठी अनिवार्य केले आहे.

५. समर्थन आणि जागरुकता

डिजीटल पेमेंटला बळी पडणे आपल्यासाठी खूप प्रत्येकासाठी त्रासदायक ठरु शकते. मित्र, कुटुंब, प्रौढ व्‍यक्‍ती, तसेच सोशल मीडिया यावरील तुमचे अनुभव, आवश्यक सुरक्षितता टिप्‍स आणि तुम्‍ही काही चुकीचे किंवा योग्‍य केले त्‍याबाबत अनुभव सक्रियपणे शेअर करा. ज्‍यामुळे त्‍यांना तुमच्‍या अनुभवामध्ये शिकवण मिळेल आणि ते सावधगिरी बाळगू शकतील.

Edited By : Sakshi sunil Jadhav

Marathwada PoliticsPolitics: जरांगेंविरोधात भाजपची मराठा खेळी? जाणून घ्या मराठवाड्यासाठी BJP चा स्पेशल फॉर्म्युला

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कोण आहेत नवीन चेहरे? वाचा

Dombivli News : राज ठाकरेंविषयी अपशब्द वापरले; मनसे कार्यकर्त्यांनी दिला रिक्षा चालकाला चोप,VIDEO

Cyclone Dana: 'दाना' चक्रीवादळ या राज्यांमध्ये धडकणार, 120 किमी वेगाने वाहणार वारे; कुठे आदळणार? वाचा

Beed Politics : पंकजा मुंडेंचा समर्थक जरांगेच्या गोटात; राजेंद्र म्हस्के बीडमधून निवडणूक लढणार? VIDEO

SCROLL FOR NEXT