Sangli Crime  Saam tv
क्राईम

Crime: एकतर्फी प्रेमातून रक्तरंजित थरार, लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली; तरुणीसह वडिलांवर विळ्याने हल्ला करत...

Sangli Crime: सांगलीमध्ये लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणाने भयंकर कृत्य केले. तरुणीच्या वडिलांवर विळ्याने वार केले. या हल्ल्यादरम्यान वडिलांना वाचवायला आलेली तरुणी देखील जखमी झाली. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary -

  • एकतर्फी प्रेम आणि लग्नासाठी नकार मिळाल्यामुळे तरुणाने भयंकर कृत्य केले

  • सांगलीतील टाकळी गावात तरुणीच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला

  • हल्यादरम्यान वडिलांना वाचवण्यासाठी गेलेली तरुणीही जखमी झाली

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये एकतर्फी प्रेमातून रक्तरंजीत थरार घडल्याची घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीच्या वडिलांवर विळ्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये आलेली मुलीचं बोट तुटलं. या हल्ल्यात दोघे जण देखील गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर देखील सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने खुरप्याने हल्ला केला. या हल्ल्यात अभयकुमार रायगोंडा पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या मुलीचे बोट तुटले आहे. दोघांवरही मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मिरज पोलिस अधिक तपास करत आहेत.

टाकळी येथील अक्षय सुभाष पाटीलने अभयकुमार पाटील यांच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली होती. मात्र अभयकुमार यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिल्याने अक्षय नाराज होता. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान अभयकुमार यांच्या मुलीचा साखरपुडा रविवारी सायंकाळी ठरला होता. ही माहिती कळताच अक्षयने राग मनात धरला. रविवारी अक्षय पाटीलने एका बॅगेमध्ये खुरपे लपवून अभयकुमार पाटील यांच्या घराजवळ पोहोचला. अचानक त्यांच्या डोक्यात खुरप्याने वार केला.

वडिलांवर हल्ला झाल्याचे पाहून अभयकुमार यांची मुलगी वाचवण्यासाठी धावून आली. मात्र हल्ला रोखताना खुरप्याच्या वारात तिचे एक बोट पूर्णपणे तुटले. हल्ल्यानंतर अक्षय पाटील तिथून पळून गेला. जखमी झालेल्या वडील आणि मुलीला तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून दोघांवरही उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिंसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी हल्लेखोर अक्षय पाटील याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

SCROLL FOR NEXT